आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील ६३% बनावट वस्तूंचे उत्पादन चीनमध्ये, एकूण आयातीच्या २.५ % प्रमाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अापण जर एखादी ब्रँडेड वस्तू खरेदी करत असाल तर सतर्क राहा. कारण ती वस्तू बनावट असू शकते. तसे पाहिले तर हँडबॅग, अत्तरापासून ते ब्रँडेड स्टॉबेरी आणि केळीदेखील बनावट तयार केली जात आहे. मात्र, सर्वात जास्त बनावट वस्तूत पादत्राणांचा समावेश आहे. यानंतर कपडे, लेदरच्या वस्तू आणि गॅजेट्सचा क्रमांक लागतो. मोठ्या कंपन्यांच्या नावाने मशीन, उपकरणे, केमिकल्स, औषधी, वैद्यकीय उपकरणे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, खेळणीदेखील बनवली जात आहे.

जगातील मोठ्या कंपन्यांच्या बनावट वस्तू सर्वात जास्त चीनमध्ये तयार होतात. आयसीडीच्या एका अहवालानुसार ६३.२ टक्के बनावट वस्तू एकट्या चीनमध्ये बनतात. याबाबत भारत १.२ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार २०१३ मध्ये सर्व देशांमध्ये ४६१ अब्ज डॉलरच्या (३०.६ लाख कोटी रुपये) बनावट वस्तू आयात झाल्या. एकूण जागतिक आयातीच्या तुलनेत हा अाकडा २.५ टक्के आहे. २०१३ मध्ये जगात एकूण १७.९ लाख कोटी डॉलरच्या (११९० लाख कोटी रुपये) वस्तू आयात झाल्या होत्या. या अभ्यास अहवालात ऑनलाइन पायरसीचा समावेश करण्यात आलेला नाही. २००८ च्या अहवालानुसार जागतिक आयातीच्या १.९ टक्के बनावट वस्तू आयात झाल्या असल्याचे आयसीडीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. २०११ ते २०१३ दरम्यान विविध देशांच्या कस्टम विभागाने पाच लाख प्रकरणांत बनावट वस्तू पकडल्या आहेत.

बनावटमुळे नुकसान
बनावट ऑटो पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात, तर औषधांमुळे आजारी व्यक्ती अधिक आजारी पडू शकते, खेळण्यांमुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. वैद्यकीय उपकरणे चुकीचे गुणांकन करू शकतात.
सर्वात जास्त बनावट पादत्राणे आणि कपड्यात
> अमेरिका, इटली आणि फ्रेंच ब्रँडच्या जास्त बनावट वस्तू बनतात
> युरोपियन युनियनमध्ये ५% आयात केलेल्या वस्तू बनावट असतात
> सर्वात जास्त ६२% बनावट वस्तू पोस्टाच्या माध्यमातून आयात होतात
> २००८ मध्ये १.९% आयात केलेल्या वस्तू बनावट होत्या, २०१३ मध्ये २.५ %
पुढील स्‍लाइडवर वाचा, बनावट वस्तू बनवण्यात भारताचा पाचवा क्रमांक
बातम्या आणखी आहेत...