आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DB SPL: ३०० वर्षांत झाला नाही असा बदल घडेल मोबाइल इंटरनेट क्रांतीतून- मुकेश अंबानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिओच्या यशस्वी लाँचिंगनंतर इंटरनेट बाजारपेठेत नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ‘भास्कर’चे डॉ. भारत अग्रवाल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली. मुकेश यांनी सर्व विषयांवर मोकळेपणाने मते मांडली. या चर्चेतील मुख्य अंश पुढीलप्रमाणे...

-मोबाइल इंटरनेट देशात कसा बदल घडवेल. जिओची यात काय भूमिका असेल?
औद्योगिक क्रांतीनंतर मोबाइल इंटरनेट क्रांती सर्वात मोठी आहे. ३० वर्षांत जगात गेल्या ३०० वर्षांत झाला नाही, असा बदल घडेल. जिओ जीवन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल.

-तुम्ही नियंत्रण म्हणालात. खिशात इंटरनेट ठेवून व्यक्ती जीवन नियंत्रित करू शकते?
का नाही? आपण कुणावर का अवलंबून राहावे? मी तरुण होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र इथे येण्यास १० दिवस लागत. आज इंटरनेटवर रिअल टाइममध्ये पण मेसेज पाठवतो आहोत, हेच भविष्य आहे.

-पहिल्यांदा उद्यमशील होणाऱ्या देशातील तरुणांना आपण काय सल्ला द्याल?
ग्राहकांची समस्या सोडवण्यासाठी कायम त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करा. योजना आखून उद्दिष्ट गाठवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. पुढील १०-१५ वर्षे सोनेरी आहेत.

-तुम्ही शिकण्यासाठी किती वेळ देता?
माझी शिक्षणाची विस्तृत कक्षा आहे. मी अध्यात्म, तंत्रज्ञान, मीडिया व एंटरटेनमेंटशी संबंधित बाबी वाचतो.
पुढील स्लाईडवर वाचा.... या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर काय म्हणाले मुकेश अंबानी....
बातम्या आणखी आहेत...