आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना निर्णय घेण्यास जास्त स्वातंत्र्य देण्याची गरज - जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीत गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना एनटीपीसीचे सीएमडी डाॅ. अरूप राॅय चौधरी. सोबत भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल आणि संचालक गिरीश अग्रवाल. छाया : मंगल - Divya Marathi
नवी दिल्लीत गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना एनटीपीसीचे सीएमडी डाॅ. अरूप राॅय चौधरी. सोबत भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल आणि संचालक गिरीश अग्रवाल. छाया : मंगल
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (पीएसयू) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत थोडी लवचिक भूमिका घेण्याची बाजू केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बोलून दाखवली आहे. निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामुळेच खासगी कंपन्या बक्कळ नफा कमावू शकतात, परंतु नेमके याउलट पीसीयूकडून एखादा निर्णय घेतला गेल्यास भ्रष्टाचाराच्या आरोपाला तोंड द्यावे लागते, असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आपल्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यात दुरुस्तीला महत्त्व दिले आहे. दैनिक भास्कर समूहाच्या वतीने आयोजित इंडिया प्राइड अॅवाॅर्ड सोहळ्यात केंद्रीय अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले, तीन पायांची शर्यत करतानाही पीएसयू चांगली कामगिरी बजावत आहेत.

दिल्लीत गुरुवारी आयोजित इंडिया प्राइड अवाॅर्ड सोहळ्यात दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले, चांगले काम करूनही बहुतांश मीडिया पीएसयूच्या विरोधात नकारात्मक बातम्या छापतात. खरे तर सार्वजनिक क्षेत्रातील हे उपक्रम आर्थिक क्षेत्राला मोठे योगदान देत आहेत. सोहळ्यात सुमारे २९ विवध श्रेणींतील वेगवेगळ्या पीएसयूंचा सन्मान करण्यात आला.

सोहळ्यात एनटीपीसीचे सीएमडी डाॅ. अरूप राॅय चौधरी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एनटीपीसीला अन्य दोन पुरस्कारही देण्यात आले. डाॅ. चौधरी म्हणाले, एनटीपीसीच्या कर्मचा-यांना या अवाॅर्डचे श्रेय जाते. अशाच पद्धतीने देशाच्या विकासात योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील. सोहळ्यास दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्यासह संचालक गिरीश अग्रवाल, कार्यकारी संचालक डाॅ. भरत अग्रवाल, चीफ काॅर्पोरेट सेल्स अँड मार्केटिंग आॅफिसर प्रदीप द्विवेदी, सचिव टेलिकम्युनिकेशन राकेश गर्ग, कमिश्नर एनसीआर डाॅ. कुश वर्मा, सचिव सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी विजय राघवन आणि अनेक पीएसयूचे सीएमडी, अधिकारी उपस्थित होते.