आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nestle Maggi Will Hit The Indian Market In This November

या महिन्यात जिभेवर ठेवा गरमागरम मॅगी, बाजारपेठेत होणार दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला या महिन्यात मॅगी नुडल्सची चव चाखायला मिळणार आहे. दोन मिनिट्स मॅगी नुडल्सचे उत्पादन करणारी कंपनी नेस्लेने सांगितले आहे, की नवीन पद्धतीने तयार करण्यात आलेली मॅगी सर्व प्रकारच्या चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. ही मॅगी खाण्यासाठी योग्य आहे.
नोव्हेंबर महिन्यातच नवीन मॅगीची किरकोळ बाजारपेठेत विक्री सुरु केली जाईल, असे मॅगीने सांगितले आहे. भारतातील तीन कारखान्यांमध्ये मॅगीचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून हिरवा कंदील मिळाल्यावर मॅगी बाजारपेठेत आणली जाईल, असे काही दिवसांपूर्वीच नेस्ले कंपनीने सांगितले होते.
मॅगी नुडल्समध्ये शिसे आणि एमएसजीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे काही प्रयोगशाळांमध्ये आढळून आले होते. त्यानंतर मॅगीच्या विक्रीवर जुन महिन्यात बंदी घालण्यात आली होती. नवीन मॅगीचे सॅम्पल मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तीन प्रयोगशाळांना पाठविण्यात आले होते. त्यांनी नवीन मॅगीच्या विक्रीला परवानगी दिली आहे.
बंदी घालण्यात आल्यानंतर 450 कोटी रुपयांची तब्बल 30,000 टन मॅगी सिमेंट कंपन्यांमध्ये इंधनाच्या रुपात वापरुन नष्ट करण्यात आली होती. दरम्यान, दिशाभुल करणाऱ्या जाहिराती, चुकीचे लेबलिंग आणि बनावट व्यापार केल्यामुळे ग्राहक संरक्षण मंत्रालयाने मॅगीवर 640 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.