आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्वी नेस्लेचे चॉकलेट, मटणही बाजारातून मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅगीतील शिसे आणि बंदीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेस्लेची इतर उत्पादनेही काही वर्षांपूर्वी अनेक देशांतून मागे घेण्याची नामुष्की कंपनीवर आल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यात चॉकलेटपासून कंपनीच्या ब्रँडेड मीटपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये २०१३ मध्ये चंकी किटकॅट नावाचे चॉकलेटमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळून आले होते. त्यामुळे पीनट बटर, अक्रोड इत्यादी फ्लेव्हरचे चॉकलेट बाजारातून मागे घ्यावे लागले होते.

१९१२ पासूनचे नाते
नेस्लेचे भारताशी १९१२ पासूनचे नाते राहिले आहे. ‘नेस्ले अँग्लो-स्विस मिल्क कंपनी’ नावाने भारतात प्रवेश. नेस्लेने ‘मॅगी’ मालकी घेतली. स्वातंत्र्यानंतर १९६१ साली पंजाबमध्ये (मोगा ) पहिला कारखाना. पंजाबच्या अर्थकारणाला गती मिळावी म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांना नेस्लेचा विकास व्हावा, असे वाटत होते. त्यानुसार मॅगी पुढल्या पंचवीस वर्षांत घराघरात पाेहोचली.

आयात बंदीचे संकेत
नेस्लेच्या मॅगीचे उत्पादन भारतातून अमेरिका, संयुक्त अरब-अमिरात, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्यात होते. परंतु वादानंतर आता या देशांनी बंदीचे संकेत दिले आहेत. सिंगापूरने तर विक्रीवर बंदी घातली.
पुढे वाचा,