आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळाची मंजुरी :नवीन युरिया धाेरण देणार खत उत्पादनाला चालना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढील चार वर्षांत खत उत्पादनामध्ये देशाला स्वयंपूर्ण करतानाच शेतकऱ्यांना सेंद्रिय द्रव्याचा वेळेवर पुरवठा व्हावा यादृष्टीने केंद्र सरकारने सर्वसमावेशक अशा नवीन युरिया धाेरणाला मंजुरी दिली अाहे.

शेतकऱ्यांवरील अनुदानाच्या भाराचे सुसूत्रीकरण करणे तसेच त्यांना युरियाचा वेळेवर पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुढच्या चार वर्षांसाठी सर्वसमावेशक नव्या युरिया धाेरणाला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युराेचे महासंचालक फ्रँक नराेन्हा यांनी या बैठकीनंतर ‘ट्विट’ करताना म्हटलेे. फाॅस्फेट अाणि पाेटॅशियम खतांसाठी २०१५-१६ या वर्षासाठी मंत्रिमंडळ समितीने निश्चित अनुदानाच्या दरालादेखील मंजुरी दिली अाहे. यामुळे खत कंपन्यांना खेळत्या भांडवलाची अडचण साेडवण्यास मदत हाेऊ शकेल, असे नराेन्हा यांनी सांगितले.

सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या युरिया खताची विक्री प्रतिटन ५,३६० रुपये या सर्वाधिक अनुदानित दराला करण्यात येते. कमाल किरकाेळ किंमत अाणि खत उत्पादनाचा खर्च यातील फरकाची रक्कम उत्पादकांना केंद्र सरकारकडून अनुदान रूपात देण्यात येते. युरिया धाेरणामुळे खत उत्पादनाला चालना मिळेल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले हाेते.
समभागांना मागणी
नवीन युरिया धाेरणाला मंजुरी मिळाल्यानंतर शेअर बाजारात खत समभागांना मागणी अाली. त्यामुळे खत कंपन्यांच्या समभाग किमतीत जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...