आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नविन वर्षात ऑनलाइन कंपन्‍यांकडून बंपर ऑफर, 80% पर्यंत मिळतेय सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  नविन वर्षानिमित्‍त ग्राहकांना खरेदीसाठी आकृष्‍ट करण्‍यासाठी ई-कॉमर्स कंपन्‍यांकडून मोठे डिस्‍कांउट ऑफर्स दिल्‍या जात आहेत. तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे की, नोटबंदीमुळे कंपन्‍यांच्‍या खरेदीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्‍यांचा जूना मालही तसाच पडून आहे. त्‍यांची विक्री व्‍हावी म्‍हणून फ्लिपकार्ट, स्‍नॅपडिल, अॅमेझॉन आणि मिंत्रा या कंपन्‍यांनी त्‍यांच्‍या उत्‍पादनांवर घसघशीत 80 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली आहे. याव्‍यतिरिक्‍त इलेक्ट्रॉनिक उत्‍पादनांवरही एक्‍सचेंज ऑफर दिल्‍या जात आहेत. 
 
काय आहेत ऑफर्स 
 
स्‍नॅपडिल

स्‍नॅपडिलने 'अनलॉक्‍स 2017 सेल ऑफर' लाँच केली आहे. कंपनीने म्‍हटले आहे, ही ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे, जे खरेदीसाठी ईयर एंडची वाट पाहतात. या ऑफरमध्‍ये मोबाईल फोन, होम, इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्स आणि अपॅरलसहीत अनेक वस्‍तूंवर 80 टक्‍क्‍यांपर्यंत सूट  दिली जाईल. 
 
फ्लिपकार्ट 

3 ते 5 जानेवारीदरम्‍यान फ्लिपकार्ट फॅशल सेल सुरु होत आहे. या कालावधीत केलेल्‍या खरेदीवर फ्ल्पिकार्टतर्फे 50 ते 80 टक्‍के सूट दिली जाणार आहे. फुटवेअर खरेदीसाठी ही सूट 40 ते 80 टक्‍के आहे. 
 
अॅमेझॉन 

अॅमेझॉनवरही 'अॅमेझॉन फॅशन ऑफर्स' सुरु आहे. अॅमेझॉनवरील विविध वस्‍तुंच्‍या खरेदीवर 40 ते 80 टक्‍के सूट दिली जात आहे. 
 
मिंत्रा 

मिंत्रावर 3 ते 5 जानेवारीपर्यंत चालणारा एंड ऑफ सिझन सेल सुरु झाला आहे. कंपनीतर्फे काही उत्‍पादन अर्ध्‍या किमतीवरच विकल्‍या जात आहेत. मिंत्राच्‍या सिझन सेलमध्‍ये पूमा, नाइक, यूसीबी, वीरो मोडासह अनेक मोठया ब्रँड्सवर मोठी सूट दिली जात आहे. याव्‍यतिरिक्‍त विविध उत्‍पादनांवर 80 टक्‍के सूट दिली जात आहे. 
 
10 टक्‍के अति‍रिक्‍त सूट 

स्‍नॅपडिलच्‍या खरेदीवर फ्रिचार्ज किंवा अॅक्सिस कार्डने पेमेंट केले, तर या खरेदीवर 10 टक्‍के अतिरिक्‍त सूट स्‍नॅपडिलतर्फे दिली जाणार आहे. कंपनीने म्‍हटले आहे की, पेंमेट करण्‍यासाठी ग्राहकाने प्रिपेड ऑप्शन निवडल्‍यास त्‍याला आपोआप प्रिमीयम स्‍नॅपडिल गोल्‍डवर अपग्रेड केले जाईल. यामध्‍ये झिरो शिपिंग चार्ज, फ्री एक्‍सप्रेस डिलिवरी आणि 14 दिवसांपर्यंत रिर्टन पॉलिसी या सेवा दिल्‍या जातील.
 
अॅमेझॉनचा एसबीआयसोबत करार 

अॅमेझॉनने स्‍टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. त्‍यानुसार एसबीआय क्रेडिट कार्डने खरेदी केल्‍यावर 10 टक्‍के अतिरिक्‍त सूट देण्‍यात येणार आहे. 
 
फ्लिपकार्टची ऑफर 

फ्लिपकार्टनेही एचडीएफसी बॅंकेसोबत करार केला आहे. त्‍यानुसार एचडीएफसीच्‍या क्रेडीट कार्डने खरेदी केल्‍यास फ्ल्पिकार्ट 10 टक्‍के अतिरिक्‍त सूट देणार आहे.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जुन्‍या उत्‍पादनांवर मिळत आहे ऑफर 
 
 
बातम्या आणखी आहेत...