आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी संख्येबाबत १० वर्षांत इंग्लंडला मागे टाकत भारत बनणार तिसरा मोठा देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनिव्हा - विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत पुढील १० वर्षांत इंग्लंडला मागे टाकत जगात तिसरा सर्वात मोठा देश ठरणार आहे. चीन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. असा अंदाज ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’च्या (आयएटीए) अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
जगभरातील विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने वाढणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवीन विमान प्रवाशांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी हे आशिया-प्रशांत क्षेत्रातील भारत आणि चीनसारख्या देशांमधील असतील. आयएटीएने विमान प्रवासी संख्येत दरवर्षी सरासरी ३.७ टक्क्यांच्या दराने अंदाजे वाढ गृहीत धरून हा अंदाज व्यक्त केला आहे. लोकांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच पर्यटन, व्यापार आणि कामासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे विमान सेवेमध्ये जबरदस्त वाढ येणार असल्याचा दावा असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर डी. जुनिएक यांनी केला आहे.

भारत-चीनमध्ये मागणी
भारतीय आणि विदेशी विमान प्रवासाबाबत चीन २०२९ पर्यंत अमेरिकेला मागे टाकत प्रथम क्रमांकावर येईल, तर भारत २०२६ पर्यंत विमान उड्डयन आणि विमान प्रवाशांच्या संख्येबाबत इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर येईल. दहा वर्षांत विकसनशील देशांच्या विमान प्रवाशांच्या संख्येत २४ ते ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

पायाभूत सुविधेचे आव्हान
या देशांनी संरक्षणवादी धोरणाचा अवलंब केला तर २०३५ पर्यंत प्रवाशांची संख्या ५.८ अब्जपर्यंत मर्यादित राहू शकते, असाही इशारा आयएटीएने दिला आहे. भारत-चीनसारख्या देशात रनवे, टर्मिनल, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा अशा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...