आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलमधील १० % हिस्सा ५३ हजारांत विकला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलचे दोन संस्थापक स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह वोजनियाक यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र, तिसरे संस्थापक रोनाल्ड वेन यांच्याविषयी खूप कमी लाेेकांना माहिती आहे. अॅपल १९७६ मध्ये स्थापन झाली होती. त्याच दिवशी कंपनीच्या कागदपत्रांवर जॉब्ज आणि वोजनियाक यांच्यासोबत वेन यांनीदेखील सही केली होती. मात्र, १२ दिवसांनंतर त्यांनी कंपनी सोडली.

अॅपलमध्ये वेन यांची १० टक्के भागीदारी होती. कंपनी सोडल्यानंतर त्या बदल्यात जॉब्ज आणि वोजनियाक यांनी त्यांना ८०० डॉलर (सध्याचे ५३,००० रुपये) दिले होते. सध्याच्या स्थितीला अॅपल ६१५ अब्ज डॉलर म्हणजेच ४० लाख कोटी रुपयांची कंपनी अाहे. या हिशेबाने वेन कंपनीसोबत कायम राहिले असते तर त्यांची भागीदारी सुमारे चार लाख कोटी रुपयांची असती. वास्तविक अॅपलच्या लिस्टिंगमध्ये त्यांची भागीदारी कमी झाली असती तरी ते आज अब्जावधी रुपयांचे मालक असते.

असे असले तरी ८१ वर्षीय वेन यांना अॅपलचे शेअर विकण्याचा पश्चात्ताप नाही. अॅपलच्या आधी ते जॉब्ज यांच्यासोबत व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीत काम करत होते. या कंपनीत वेन कॉम्प्युटर प्रोग्रामर होते. अॅपलमध्ये त्यांना इंजिनिअरिंग आणि डॉक्युमेंटेशनची जबाबदारी मिळाली होती. मात्र, इंजिनिअरिंगमध्ये त्यांची क्षमता कमी असल्याने जॉब्ज यांनी ती जबाबदारी काढून घेतली. वेन "वरिष्ठ' असल्याने त्यांना कंपनीत घेण्यात आले होते. त्या वेळी जॉब्ज यांचे वय २१ वर्षे, वोजनियाक २६, तर वेन ४१ वर्षांचे होते. कंपनीचा लोगो बनवण्यासाठी त्या वेळी त्यांना १० टक्के इक्विटी देण्यात आली होती. याव्यतिरिक्त वोजनियाक आणि जॉब्ज यांच्यातील भांडण मिटवण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते. अॅपल सोडल्यानंतर वेन यांनी अनेक छोट्या कंपन्यांमध्ये काम केले. वेन हे जॉब्ज यांनी मिळवलेल्या यशाची प्रशंसा करत असले तरी त्यांच्या दृष्टीने वोजनियाक जास्त योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी अॅपलचा पहिला लोगो बनवला होता. यात त्यांनी शास्त्रज्ञ न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडताना दाखवले होते. "मी दोन महारथींच्या छत्रछायेत उभा असलो तरी माझे मन व्हिडिओ गेम्स बनवण्यातच रमत होते. स्वत:विषयी ते सांगतात की, "मी श्रीमंत नसलो तरी उपाशीदेखील नाही. म्हातारपणी आयुष्य आरामात सुरू आहे. त्यासाठी कंपनी स्थापनेची कागदपत्रे, अॅपलचा मूळ लोगो, पहिल्या कॉम्प्युटरचे माहितीपत्रक सर्वकाही लाखो रुपयांत विकले आहे. पैसा मलादेखील आवडतो. जर मला पैशाचीच जास्त हाव असती तर मी श्रीमंत असतो, त्याचबरोबर त्रस्तदेखील असतो.