आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड बाबा | ८० लाख भक्तांचा बाजार, ९०० कोटींचा बिझनेस, हरियाणात वाढतोय उद्योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - बिझनेसमॅन बाबा, ८० लाख भक्त व हरियाणा. धर्म-अध्यात्म व योगासह व्यवसायात उतरलेल्या बाबांसाठी मोठी बाजारपेठ. योगगुरू रामदेव "स्वदेशी स्वीकारा' व संत गुरमीत राम रहीम "थोडे थांबा, जैविक घेऊन जा'च्या नाऱ्यासह एकमेकांसमोर उभे आहेत. ब्रँड बाबांसाठी व्यावसायिक परिस्थिती अनुकूल आहे. हरियाणा रामदेबाबांचे जन्मस्थळ तर राजस्थानात श्रीगंगानगर येथे जन्मलेल्या राम रहीम यांची कर्मभूमी आहे.

भक्तांचा हा खेळ आणि व्यवसायाचे राजकीय कनेक्शनदेखील मजबूत आहे. दोघांच्या भक्तांची मोठी संख्या त्यांना व्यापार वाढवण्यासाठी आकर्षित करत आहे. पतंजलीचे हरियाणा प्रभारी त्रिलोकचंद शर्मा म्हणतात की, २००६ मध्ये सुरू झालेल्या पतंजलीचे आज देशभरात सुमारे ५००० रिटेल सेंटर आहेत. पैकी सर्वाधिक १००० केंद्रे हरियाणात आहेत. बाबांचे ६०-७० लाख अनुयायी (योग व आयुर्वेदाला मानणारे) पतंजलीच्या उत्पादनांचा वापर करत आहेत.
पतंजली राज्यात ७०० कोटींचा वार्षिक व्यापार करत आहे. पुढील वर्षभरात ५ हजार कोटींची गुंतवणूक करून १० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तर १५ दिवसांपूर्वी लाँच झालेल्या एमएसजी ब्रँडचे प्रवक्ता डॉ. आदित्य इंसांच्यानुसार राज्यात २५० पेक्षा जास्त ब्रँडेड स्टोअर सुरू झाले आहेत. ३०० पेक्षा जास्त िवतरक नियुक्त केले आहेत. आमचे उद्दिष्ट देशात १५०० स्टोअर्स सुरू करण्याचे आहे. डॉ. आदित्य यांच्या दाव्यानुसार बाबांच्या भक्तांसह सर्वसामान्य लोकदेखील आमची उत्पादने वापरत आहेत.
हरियाणाच का...
> गाय, गीता, आर्य समाजाची भूमी
> राजकीय कनेक्शन
> व्यावसायिक परिस्थिती अनुकूल
> ३००० पेक्षा जास्त पतंजलीची केंद्रे देशात दोन वर्षांत सुरू झाली
> १००० केंद्रे हरियाणात पतंजलीची सुरू संख्या देशात सर्वाधिक
> २५० ब्रँडेड एमएसजीचे स्टोअर १५ दिवसांत हरियाणात सुरू झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गाय, गोशाळेचा आधार ... एकाचे जन्मस्थळ, दुसऱ्याची कर्मभूमी;विस्ताराची ३ कारणे... जैविक उत्पादनांनी लोकांना स्वस्थ ठेवणे आमचे लक्ष्य.. जोरदार प्रचार, दावा देशी उत्पादनांचा ...
बातम्या आणखी आहेत...