आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्रा स्टरलाइट, बिडकीनमध्ये गॅजेट हब, उद्योगमंत्री देसाई यांची औरंगाबादेत घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्टरलाइटचा महाराष्ट्रातून बाहेर गेलेला प्रकल्प राज्य सरकारने परत ओढून आणण्यात यश मिळवले असून तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेंद्रा डीएमआयसीत येत आहे. तर देशातील मोबाइल गॅजेट तयार करणारे मॅन्युफॅक्चरिंग हब बिडकीन डीएमआयसीत होणार आहे. ही घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे आयोजित ब्रह्मोद्योग संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी केली.

बीड बायपासवरील गुरू लॉन येथे दोनदिवसीय ब्राह्मण उद्योजकांच्या वतीने ब्रह्माेद्याेग संंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद‌्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी ब्राह्मण उद्योजकांचे राज्यासाठी योगदान विशद केले. शेंद्रा डीएमआयसीत लवकरच स्टरलाइटचा महत्वाकाक्षी प्रकल्प सुरू होत आहे. तसेच बिडकीनच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मध्ये देशातील महत्त्वाचे मोबाइल उत्पादनाचे गॅझेट हब तयार करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा त्यांनी या वेळी केली.
देसाई म्हणाले की सरकारचा सर्वधिक पैसा कच्चे तेल अन इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आयातीवर खर्च होतो. त्यामुळे आता आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे उत्पादन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. त्याचे हब औरंगाबाद डीएमआयसीत राहणार आहे. हीच मेक इन इंडियाची खरी सुरुवात राहील.
सिडबी देणार कर्ज
लघुउद्योजकांना कर्ज देण्यास राज्य सरकारने ‘सिडबी’ला मदत केली असून या बँकेमार्फत २०० कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय मुद्रा बँकेकडूनही कर्ज उपलब्ध होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...