आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार देण्यात भारतातील आयटी कंपन्या खूप मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस मिळवला असला तरी पगाराच्या बाबतीत या कंपन्या खाली आहे. सर्वात कमी पगार देणाऱ्या देशांच्या यादीत भारतीय आयटी कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. नोकर भरती संस्था असलेल्या मायहायरिंगक्लब डॉट कॉमने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.
भारतीय कंपन्या मध्यम दर्जाच्या व्यवस्थापकांना साधारणपणे २७.०९ लाख रुपयांपर्यंत पगार देतात. याच कामासाठी स्वित्झर्लंडच्या कंपन्या चाैपट म्हणजेच १.१२ कोटी रुपये पगार देतात. सर्वात कमी पगार १६.८८ लाख रुपये बल्गेरिया येथे देण्यात येतो. मायहायरिंगक्लब डॉट काॅमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी टॅलेंट स्वस्त आहे, अशा ठिकाणी कमी महत्त्वाचे काम दिले जात आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपमध्ये नोकऱ्यांची संख्या कमी असली तरी त्या खूप महत्त्वपूर्ण आणि अवघड आहेत. त्यांना मोबदल्यात पैसादेखील जास्त मिळतो. यातही आता भारतीय वाटा वाढत आहे.