आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाचे मूल्य वाढल्याने निर्यातीत घट : असोचेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रुपयाचे वास्तविक मूल्य वाढल्यानेच निर्यात घटली असल्याचे मत उद्योग चेंबर असोचेमच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. विनिमय दराच्या आधारावर डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाला असला तरी कमोडिटिजच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्यामुळे रुपयाचे वास्तविक मूल्य वाढले आहे. यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपली निर्यात कमी होत आहे.
‘व्हाॅट्स बिहाइन्ड इंडियाज डिक्लाइनिंग एक्स्पोर्ट‌्स’ या असोचेमच्या अहवालानुसार ऑर्डरमूल्यात जवळपास १० टक्क्यांची घसरण झाली आहे. निर्यात मूल्यात होत असलेली घसरण थांबवण्यासाठी रुपयाची किंमत १० ते १५ टक्क्यांनी कमी करावी लागणार आहे. असे झाल्यास निर्यातदारांना दिलासा मिळेल.

काही निवडक क्षेत्रातील निर्यात वाढवण्यासाठी त्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत देखील चेेंबरच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. लघु उद्योगांना (एमएसएमई) सवलत मिळाल्यास या उद्योगांना ९ ते १० टक्क्यांनी कर्ज मिळेल अशी अपेक्षा चेंबरने व्यक्त केली.