आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिरता, सीईओचा शोध, कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर लक्ष; इन्‍फोसिसचे अध्‍यक्ष निलेकणी यांचा मनोदय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसचे नवीन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी त्यांचा प्राधान्यक्रम सांगितला आहे. गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांची चिंता दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे लक्ष नवीन सीईओंची नियुक्ती आणि संचालक मंडळाचे पुनर्गठन यावर राहणार असल्याचेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये सुधारणा करून कंपनीची प्रतिष्ठा परत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विश्लेषकांसोबत झालेल्या कॉन्फरन्स कॉल आणि मीडियाशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, “मी कंपनीच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच त्यासमोरील आव्हाने पेलण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत येथे राहील. जितकी गरज असेल, तितके कष्ट करण्याची माझी तयारी अाहे.’ कॉन्फरन्स कॉलमध्ये विक्रमी ६०० विश्लेषक होते.  त्यांनी संचालक मंडळासोबत बैठकदेखील केली. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्तींसाेबतचा वाद “दुर्भाग्यपूर्ण’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कंपनीचे अध्यक्ष आर. शेषासायी आणि उपाध्यक्षपदाचे सिक्का यांच्यासह चार संचालकांनी गुरुवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर कंपनीने निलेकणी यांना नवीन अ-कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवरील विकास कंपनीचे पुढील धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  ऑक्टोबर महिन्यात विस्ताराने चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
 
किरण मजूमदारांच्या नेतृत्वातील समिती  
बायोकॉनच्या सीएमडी आणि इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालक किरण मजूमदार शॉ यांच्या नेतृत्वातील समिती नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा  (सीईओ) शोध घेणार आहे. जागतिक पातळीवरील कंपनी चालवण्याचा अनुभव आणि तंत्रज्ञानातील कौशल्य असलेल्या व्यक्तीची या जागेवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती कंपनीच्या संचालक मंडळाचे पुनर्गठन करण्याचीही योजना तयार करणार आहे.

जुन्या नावांची चर्चा  
सीईओ पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्यामध्ये  हंगामी सीईओ प्रवीण राव, सीएफओ रंगनाथन, डेप्यूटी सीओओ रविकुमार, बीएफएसआय विभागाचे प्रमुख मोहित जोशी, माजी सीएफओ व्ही. बालाकृष्णन आणि मोहनदास पै, अमेरिकी ऑपरेशन्सचे माजी प्रमुख अशोक वेमुरी आणि माजी अध्यक्ष बी. जी. श्रीनिवास यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...