आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मोटर्स ‘नॅनो’चे उत्पादन बंद करणार नाही, पर्यायी योजनेवर काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स महत्त्वाकांक्षी छोटी कार नॅनोचे उत्पादन बंद करणार नाही. याउलट कंपनी सध्या पर्यायी योजनांचा विचार करत आहे. यात नॅनो कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचाही समावेश आहे. कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (सीओओ) सतीश बोरवणकर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “या मॉडेलसोबत कंपनीची भावना जोडलेली आहे. यामुळे नॅनोचे उत्पादन बंद करण्याची कोणतीच योजना नाही. नॅनोचे उत्पादन सुरूच राहावे अशी शेअरधारकांचीही इच्छा आहे.’   

उल्लेखनीय म्हणजे नॅनोची विक्री कमी झाल्याने या कारचे उत्पादन करणे सध्या फायद्याचे राहिलेले नाही. नॅनोच्या भविष्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोरवणकर यांनी ही माहिती दिली. उद्योग संघटना सीआयआयच्या कार्यक्रमात ते मीडियाशी चर्चा करत होते. ते म्हणाले की, “सध्या दरमहिन्याला सुमारे १००० नॅनो कारची विक्री करण्यात येत आहे. कंपनीने पश्चिम बंगालमधील सिंगूरमधील प्रकल्प बंद केल्यानंतर गुजरातमधील साणंद येथील प्रकल्पात नॅनोचे उत्पादन स्थलांतरित केले.  या प्रकल्पात नॅनोव्यतिरिक्त दोन इतर प्रवासी वाहने (पीव्ही) टिएगो आणि टिगोरचे उत्पादन होते. टिएगो आणि टिगोरचे उत्पादन नॅनोच्या कमी उत्पादनाच्या तुलनेत खूप जास्त आहे.’

दिवाळीत नव्या एसयूव्हीची तयारी : बोरवणकर यांनी सांगितले की, ‘टाटा मोटर्स एक कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) आणण्याची तयारी करत आहे. या वाहनाचे उत्पादन पुण्यातील रांजणगावमध्ये असलेल्या प्रकल्पात होत आहे. ही एसयूव्ही दिवाळीच्या आधी बाजारात दाखल होईल.’ व्यावसायिक वाहन बनवणाऱ्या प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढून ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर प्रवासी वाहने तयार होत असलेल्या प्रकल्पात पू्र्ण क्षमतेने उत्पादन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ  
प्रवासी वाहनासोबत व्यावसायिक वाहनांची (सीव्ही) विक्री कमी होण्याबाबत बोरवणकर म्हणाले की, “ग्राहकांशी जोडले जाण्याबाबतच्या अडचणी असून त्यात सुधारणा करण्यात येत आहे. आम्ही डीलर्सकडे जाऊन त्यांच्या गरजेनुसार त्यांचे मुद्दे समजून घेत आहोत. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विक्रीत वाढ झाली आहे. सध्या मागणी कमी असल्याने सहयोगी कंपन्यांच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र, मागणी वाढल्यानंतर पुरवठा वाढवण्यावर काम होत आहे.’
 
बातम्या आणखी आहेत...