आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार जडजवाहिरे निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देणार : िनर्मला सीतारामन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जडजवाहिरे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या वतीने पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग तथा वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. सार्वजनिक क्षेत्रातील सुवर्ण ट्रेडर्स असलेल्या एमएमटीसीच्या वतीने आयोजित ३७ व्या सुवर्ण
महोत्सवाच्या उद््घाटन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

या क्षेत्रातील निर्यातदारांसमोर मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे निर्यातीवर त्याचा परिणाम होताना दिसत असून या क्षेत्राला सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात रत्न तसेच दागिन्यांची निर्यात २२.४२ टक्क्यांनी वाढून ४.४६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर असलेली कमजोर मागणी तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे डिसेंबर २०१४ पासून निर्यातीत सलग १८ महिन्यांपासून मे २०१६ पर्यंत घसरण नोंदवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. निर्यातीत फक्त या जून महिन्यात वाढ झाली असली तरी नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली.

सप्टेंबर महिन्यात मात्र यामध्ये पुन्हा वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. एमएमटीसीने सुवर्ण नाण्यांना लोकप्रिय बनवण्यासाठी पूर्ण देशभरात प्रचार-प्रसार करण्याची अावश्यकता असून त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

गुंतवणुकीतील वाढीसाठी भारत-अमेरिकेदरम्यान चर्चा
अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ सध्या भारत दौऱ्यावर आले असून दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी मायकल फ्रोमॅन यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळ १० व्या भारत-अमेरिका व्यापार धोरण मंच (टीपीएफ) मध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहे. अमेरिकेने सामाजिक सुरक्षेच्या सामंजस्य करारासंदर्भात भारताशी चर्चा करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मत या वेळी उद्योग तथा वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. याबाबत सामंजस्य करार झालेला नसल्याने भारतीय आयटी तज्ज्ञांना अमेरिकेत रोजगार मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...