आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम उद्योगांनी घेतली भांडवली भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल उभारणी करणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेले स्वतंत्र ‘एसएमई स्टॉक एक्स्चेंज’ फायद्याचे ठरत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एसएमई मंचावर १०० पेक्षा जास्त कंपन्यांनी नोदणी केली आहे. त्यातही अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक ३७ कंपन्यांची नोंदणी करत महाराष्ट्राने अव्वल स्थानाची नोंद केली आहे.

प्राथमिक बाजारपेठेत मरगळीचे वातावरण असून एखाद-दुसरीच कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत आहे. परंतु लघु आणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांच्या शेअर बाजारातील नोंदणीला मात्र वेग आला आहे. एसएमई शेअर बाजार सुरू झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत बीएसई एसएमई मंचावर १०६, तर एनएसई मंचावर आठ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. या कंपन्यांचे एकत्रित भांडवल १० हजार कोंटी रुपयांच्या वर गेले असल्याचे ‘एसएमई’ तज्ज्ञ व पेंटोमॅथ कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुणावत यांनी सांगितले.
पाठबळाची गरज
देशाच्या आर्थिक वाढीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगाचा वाटा हा ६० टक्के तर ४७ टक्के वाटा औद्योगिक उत्पादनाचा आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात एसएमई कंपन्या करतात. चांगला व्यवसाय असलेल्या एसएमई क्षेत्रातील कंपन्या येणाऱ्या वर्षांमध्ये उलाढाल आणि नफ्यात दुप्पट-तिप्पट वाढीची नोंद करू शकतात. त्यामुळे या क्षेत्राला अपेक्षित पाठबळ लाभल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल, असे मतही महावीर लुणावत यांनी व्यक्त केले.
जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न
लघु आणि मध्यम उद्योगातील कंपन्यांच्या वाढीसाठी भविष्यात खूप माेठ्या संधी अाहेत. परंतु या कंपन्यांना आपल्या हक्काचा शेअर बाजार आहे याची कल्पना नाही. त्याविषयी तपशीलवार माहिती नाही. त्यामुळे राज्यातल्या विविध शहरांमध्ये जाऊन तेथील उद्योजक, उद्योग संघटनांबरोबर बैठका घेऊन ‘एसएमई शेअर बाजारा’बद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर तसेच अन्य भागात बैठक घेण्याचा लुणावत यांचा विचार आहे.
महाराष्ट्राचे योगदान
साधारणपणे ४० ते ५० कंपन्या दरवर्षी शेअर बाजारात नोंदणी करतात ही मोठी गोष्ट आहे. मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेल्या पहिल्या १०० कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ३७ कंपन्यांचे बाजारहिश्शात मोठे योगदान आहे. इश्यू साइजच्या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवर असल्याकडे लुणावत यांनी लक्ष वेधले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नोंदणी झालेल्या कंपन्या, शहरनिहाय वर्गवारी