आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनअायअायटीला ५८ काेटी रुपयांचा नफा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अाघाडीवर असलेल्या एनअायअायटी टेक्नाॅलाॅजीज या कंपनीच्या अांतरराष्ट्रीय व्यवसायात भक्कम वाढ झाल्यामुळे िनव्वळ नफ्यामध्ये ३५.५ टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे एप्रिल ते जून या ितमाहीमध्ये ५८.५ काेटी रुपयांवर गेला अाहे. माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीला मागील वर्षात ४३.२ काेटी रुपयांचा नफा िमळाला हाेता. कंपनीच्या संकलित महसुलामध्ये ११ टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे अगाेदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील ५७७.६ काेटी रुपयांवरून ६४१.१ काेटी रुपयांवर गेला अाहे. एनअायअायटीच्या अांतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये ८.९ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. त्यामुळे वेतनवाढ हाेऊनदेखील कंपनीला कामकाज नफ्याचे प्रमाण कायम राखता अाल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अरविंद ठाकूर यांनी सांिगतले.