आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या उद्योजकांना बँकिंग परवाना नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन बँकिंग परवान्यासाठी सोमवारी दिशानिर्देश जाहीर केले असून त्यानुसार मोठ्या उद्योग घराण्यांना बँकेचा परवाना मिळणार नाही. असे असले तरी ते बँकेमध्ये १० टक्क्यांपर्यंत इक्विटी घेऊ शकतील. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयची मर्यादा ७४ टक्के कायम ठेवण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या व्यावसायिक बँकांप्रमाणेच या बँकांनादेखील प्राथमिकता असणाऱ्या क्षेत्राला ४० टक्के कर्जाची अट पूर्ण करावी लागणार आहे. कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी रिझर्व्ह बँक एक सल्लागार समिती बनवणार असून ती समिती यासाठी आलेल्या अर्जांवर विचार करेल. परवानानंतर १८ महिन्यांच्या आत बँक सुरू करावी लागेल नसता परवाना रद्द करण्यात येणार आहे. हे दिशानिर्देश खासगी क्षेत्रात युनिव्हर्सल बँकेसाठी “ऑन-टॅप लायसन्स’साठी आहे. ऑन-टॅप लायसन्स म्हणजे कंपनीने जेव्हा अर्ज केला त्याच वेळी त्यावर विचार करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...