आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद ठरतोय ‘आयपीओ’साठी अडथळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे जवळपास अकरा कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीतून पाच हजार काेटी रुपयांचा निधी उभारण्याची तयारी केली अाहे; परंतु किरकाेळ गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने या कंपन्यांना शेअर बाजाराचा उंबरठा अाेलांडणे सध्या तरी कठीण अाहे.
व्हीअारएल लाॅजिस्टिक्स या कंपनीच्या समभाग विक्रीला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. अायनाॅक्स विंड, अॅडलॅब्स एंटरटेनमेंट, अाॅर्टेल कम्युिनकेशन्स या कंपन्यांनीदेखील अायपीअाे अाणण्याची याेजना अाखली अाहे. अातापर्यंत एकूण ११ कंपन्यांनी भांडवल बाजार िनयंत्रक ‘सेबी’कडून अायपीअाे अाणण्याची परवानगी मिळवली असून या कंपन्या ५,०१० काेटी रुपयांचा निधी उभारतील, असा अंदाज प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हाल्दिया यांनी सांिगतले.
गेल्या सहा वर्षांमध्ये (जानेवारी २००९ पासून) जवळपास १०३ कंपन्यांना समभाग विक्रीच्या माध्यमातून ४७,८४० काेटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ‘सेबी’कडून परवानगी मिळाली हाेती; परंतु ही परवानगी एक वर्षासाठीच वैध असल्यामुळे ती रद्द झाली. त्याशिवाय ६२ कंपन्यांनी १९,९७३ काेटी रुपयांचा िनधी उभारण्यासाठी बाजार नियंत्रकांकडे समभाग विक्रीचा मसुदा (अाॅफर डाॅक्युमेंट) सादर केला हाेता, परंतु नंतर त्यांनी ताे काढून घेतला.