आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतांची कमतरता नाही, केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी व्यक्त केला विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रब्बी पिकांच्या पेरणीदरम्यान खते तसेच बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येणार असल्याचा विश्वास सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी व्यक्त करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. यासंबंधी सर्व राज्यांच्या सरकारला निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी रब्बी पिकांच्या पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी आेलावा टिकून राहावा या दृष्टीने प्रयत्न करण्याचे राज्यांना सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर तूट भरून काढण्यासाठी ऑफ सीझनमध्ये बियाणे उत्पादनाला प्रोत्साहित करण्याचे राज्यांना सांगण्यात आले अाहे. तसेच राज्यांना बियाणे प्रमाणीकरण नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी ऑक्टोबरपासूनच गहू तसेच रब्बी हंगामातील इतर पिकांच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. रब्बी कापणीचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. यादरम्यान मका, बाजरी, कडधान्य तसेच मोहरीसारख्या प्रमुख तेलबियांचे पीक घेतले जाते. वर्ष २०१६-१७ च्या रब्बी हंगामात ९.६५ कोटी टन गव्हाच्या उत्पादनाचे तर १.३५ कोटी टन कडधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कमतरता नाही : काही कडधान्य वगळता इतर सर्व रब्बी पिकांसाठीच्या बियाण्यांची कमतरता भासणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गव्हाच्या बियाण्याची उपलब्धता रब्बी हंगामादरम्यान १३६.५ लाख क्विंटल होण्याचा अंदाज आहे. ही १७७.५ लाख क्विंटलच्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच
जास्त आहे.
गरजेनुसार खते उपलब्ध
>कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ (जुलै ते जून) रब्बी हंगामात युरियाची उपलब्धता १६६.२२ लाख टन होण्याचा अंदाज असून १६६.२० लाख टन युरियाची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे.
>डाय अमोनिया फॉस्फेट (डीएपी) चा पुरवठा ५२.४५ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो ५१.४१ लाख टनाच्या मागणीपेक्षा जास्त आहे.
>म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी), एनपीके आणि सिंगल सुपर फाॅस्फेट (एसएसपी) चा पुरवठादेखील अनुक्रमे १८.५० लाख टन, ५३.७० लाख टन आणि ३३.५७ लाख टन होण्याचा अंदाज आहे.
बियाणे आवश्यकता पुरवठा
ज्वारी १.२१ १.२५
हरभरा १६ १७.६
उडीद १.०८ १.०३
(आकडे लाख क्विंटलमध्ये)
बातम्या आणखी आहेत...