आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीमुळे राज्यभरातील नाका कामगारांवर उपासमारीची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अाठ िदवसांनंतर एका कामाची िबदागी िमळाली तीही जुनी पाचशेची नाेट हातात टेकवून. अाता ही नाेट चालविण्याची पंचाईत हाय.. गेल्या अाठ िदवसांपासून कामच नसल्याने नाक्यावर यायचे आणि हात हलवत परत जायचे असे सुरू अाहे. घरखर्च कसा चालवावा हा माेठा प्रश्न अाहे,’ ही वेदना अाहे रंगकाम करणाऱ्या पांडुरंग रायकर आणि मिस्त्री िशवराम पांडे या कामगारांची. ही परिस्थिती या दोघांचीच नव्हे तर राेजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातील २५ ते ३० लाख कामगारांना या समस्येला ताेंड द्यावे लागत अाहे. गेल्या वर्षभरात नाका कामगारांना काम मिळणे कठीण झाले असतानाच केंद्र सरकारने नोटबंदी लागू केल्यापासून त्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
त्यांच्या समस्यांचा मागाेवा घेतला असता बाेलक्या प्रतिक्रिया मिळाल्या. वाल्या फिरंगी या बिगारी कामगाराला दहा आणि पाच वर्षांची दाेन मुले असून त्याचे कुटुंब अांध्र प्रदेशात राहते. ताे महिन्याला १५०० ते २००० रुपये घरखर्चासाठी पाठवताे. गेल्या अाठ दिवसांपासून एकही काम मिळाले नाही. दाेन दिवसांपूर्वी त्याने एक भिंत पाडण्याचे काम केले, पण ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्याकडे पाचशेची नाेट असल्याने त्यांनी पैसे नंतर देताे असे सांगितले. पुरेसे पैसे घरी जात नसल्याने पत्नीबराेेबर वाद हाेत असल्याचे त्यांनी सांगितले. टाइल्स बसवण्याचे काम करणारे सुखदेव काेंडके म्हणाले, घरगुती कामातून दाेन हजाराची नवीन नाेट मिळाली, पण सुटे मिळवताना मारामार हाेत असल्याने दाेन दिवसांपासून तशीच खिशात पडून अाहे. संताेष िनवरक या मिस्त्रींनी सांगितले की, िमत्रांकडून उसनवारी करून घर खर्च भागवत अाहे.
रिझर्व्ह बँकेने बँकेतून २५ हजार रुपये काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु एखाद्या घर सजावटीचे काम करण्यासाठी, सिमेंट, रेती यासारखा कच्चा माल खरेदी करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च हाेताे. घर सजावटीच्या कामात सुतार, प्लंबर, वायरमन, बिगारी असे मिळून किमान पाच ते सहा कामगार लागतात. बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा, पाचशे रुपयांच्या नाेटा मिळाल्या तर त्या जमा करा, नवीन दाेन हजारांची नाेट मिळाली तर सुट्यांचा प्रश्न, यामुळे या सगळ्यांना सायंकाळी राेजंदारी कशी देणार, अशा प्रश्नांमुळे काम मिळणे बंद झाले आहे.
राज्यात अंदाजे साडेतीन लाख कामगार पुरवणारे कंत्राटदार असून त्यापैकी काही टक्क्यांची नाेंदणी अाहे. राज्यात जवळपास २५ ते ३० लाख नाका कामगार असून ते बहुतांश असंघटित क्षेत्रातील अाहेत. या कामगारांना कामे िमळणे बंद झाले अाहे. त्यातून एखाद दुसरे काम मिळाले तरी जुन्या नोटा स्वीकाराव्या लागत अाहेत. हातावर पाेट असलेले हे कामगार सकाळी मेहनत करतात आणि सायंकाळी खातात. हातात अालेली जुनी नाेट अर्ध्या किमतीत विकून रेशन खरेदी करण्याची वेळ या कामगारांवर अाली असल्याचे बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र राठाेड यांनी सांगितले. नागपूरमध्ये ठिय्या कामगारांचे नेते विलास भाेंगाडे म्हणाले की, नाेटबंदीची घाेषणा केल्यानंतर त्यानुसार पुरेशी तयारी सरकारकडून केली न गेल्याने सामान्यांना नाहक त्रास भाेगावा लागत अाहे.

14 राज्यातील कामगार मुंबईत
पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, अांध्र प्रदेश, तेलंगण यासह जवळपास १४ राज्यांतील विविध भाषिक कामगार मुंबई आणि उपनगरातील नाक्यांवर कामाची प्रतीक्षा करत असतात. यामध्ये राज्यातील खान्देश, विदर्भ, मराठवाडा या भागातूनही माेठ्या प्रमाणावर कामगार राेजगाराच्या शाेधात मुंबईत येतात.
बातम्या आणखी आहेत...