आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांची अाता संसदेत धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पात साेन्यावर अाकारण्यात अालेले एक टक्का उत्पादन शुल्क मागे घेण्यात अाले नसले तरी इन्स्पेक्टर राज निर्माण हाेणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मागील अाठवड्यात दिली. त्यानंतर काही सराफांनी संप मागे घेतला. परंतु मुंबईतल्या जव्हेरी बाजारातील तमाम सराफा व्यावसायिकांनी मात्र अबकी बार नहीं ताे कभी नहीं अशी भूमिका कायम ठेवत २५ एप्रिलपासून सुरू हाेत असलेल्या संसदीय अधिवेशनात न्याय मिळेपर्यंत उत्पादन शुल्काविराेधातील एकजूट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे. मुंबई जव्हेरी बाजारात ५० हजार सराफांची दुकाने असून तीन लाख सुवर्ण कारागीर कार्यरत अाहेत.