आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील कच्च्या तेलाची आयात सात वर्षांतील उच्चांकावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आॅगस्ट महिन्यात कच्च्या तेलाची आयात सात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. आॅगस्ट महिन्यात भारतीय रिफाइनर्सने १८.८१ मिलियन टन कच्चे तेल आयात केले, जे गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातील कच्चे तेल आयातीच्या तुलनेत ९.१ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १७.२३ मिलियन टन कच्च्या तेलाची अायात करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम पदार्थांची मागणी देखील विक्रमी पातळीवर गेली असल्याची माहिती मंत्रालयाच्या नियोजन आणि अॅनाॅलिसिस सेलच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यातील तेल आयात एप्रिल २००९ नंतर सर्वाधिक राहिली आहे. ऑगस्ट महिन्यात इंधन विक्री ११.४ टक्क्यांनी वाढून १५.८ टक्के झाली आहे. या दरम्यान पेट्रोलची मागणी २.२ मिलियन टन विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
बातम्या आणखी आहेत...