आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Half Decad 61 Thousand Indian Billionairs Settle In Foreign

दीड दशकात विदेशात स्थायिक झाले ६१,००० भारतीय कोट्यधीश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या दीड दशकात देशातील ६१,००० करोडपती विदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. याबाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या शतकाच्या सुरुवातीपासून २०१४ पर्यंत चीनमधून ९१,००० नागरिक विदेशात स्थायिक झाले आहेत. जगात श्रीमंत नागरिकांवर संशोधन करणारी संस्था "न्यू वर्ल्ड वेल्थ आणि एलआयओ ग्लोबल'च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कर, सुरक्षा आणि मुलांचे शिक्षण हे विदेशात स्थायिक हाेण्याचे मुख्य कारण आहे.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच नागरिकत्वात बदल आणि दोन देशांचे नागरिकत्व यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतातील करोडपती मुख्यत्वे संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेणे पसंत करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनमधील करोडपती अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर आणि ब्रिटनला पसंती देतात. अहवालानुसार या कालावधीत सर्वात जास्त १.२५ लाख करोडपतींनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ब्रिटनची भाषा, लंडन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असणे, युरोपीय संघात कडक नियम नसल्याने फिरण्याचे स्वातंत्र, शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षणाची गुणवत्ता, मालमत्ता खरेदी करण्याची सुविधा आदी कारणांमुळे करोडपती नागरिकांना ब्रिटनमध्ये राहणे आवडते. येथे युरोपमधील इतर देशांव्यतिरिक्त भारत, चीन, रशिया, मध्य पूर्व आणि अाफ्रिकेतील नागरिक स्थायिक होत आहेत. ब्रिटननंतर करोडपती नागरिकांना अमेरिका, सिंगापूर आवडते.

सर्वात जास्त चीनमधून गेले
चीन ९१,०००
भारत ६१,०००
फ्रान्स ४२,०००
इटली २३,०००
रशिया २०,०००
इंडोनेशिया १२,०००
द. अाफ्रिका ८,०००
इजिप्त ७,०००

जगभरात १,४६५ कोटी मोठ्या श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतात त्यांची संख्या १.९८ लाख आहे, तर अमेरिका, जपान, जर्मनी आणि चीनमध्ये जगभरातील ६०.३ टक्के श्रीमंत व्यक्ती आहेत.
पुढे वाचा... भारतात सव्वादोन लाख मिलियनर