आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ONGC Plans To Invest Rs 40,000 Crore In KG Oil, Gas Finds

ओएनजीसीची केजी खोऱ्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातील केजी-डी-५ पट्ट्यात तेल व गॅसचे उत्पादन सुरू करण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे चेअरमन दिनेशकुमार सराफ यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले, केजी-डी-५ पट्ट्यात २०१८-१९ पर्यंत उत्पादन सुरू करण्यासाठी ओएनजीसी क्लस्टर अॅप्रोचचा वापर करत आहे. हा पट्टा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी-डी-६ ला लागूनच आहे. ते म्हणाले, कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीपर्यंत विकास योजना सादर करण्याचे नियोजन केले आहे. या पट्ट्यातील गुंतवणूक ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त राहील. कोणत्याही ठिकाणी गुंतवलेली ओएनजीसीची ही सर्वात मोठी रक्कम आहे.

असा आहे केजी-डी-५ पट्टा : हा पट्टा उत्तरीय शोध क्षेत्र (एनडीए) आणि दक्षिणीय शोध क्षेत्र (एसडीए) अशा दोन भागांत विभागलेला आहे. एनडीएमध्ये तेलाचा १२.१ कोटी टन आणि गॅसचा ७८ घनमीटर साठा असल्याची शक्यता आहे, तर एसडीएमध्ये ८०.९ अब्ज घनमीटर गॅसचा साठा असण्याची शक्यता आहे.