आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 डिसेंबरपासून मिळणार घरबसल्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची सुविधा, एजंट येतील घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टेलिकॉम कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन मोबाईल सिम आधारकार्डशी लिंक करण्याच्या असुविधेपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. एक डिसेंबरपासून हे काम घरी बसून ऑनलाईन करता येईल. युआयडीएआय आणि टेलिकॉम कंपन्यांच्या झालेल्या बैठकीत ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. सध्या सिमला आधारशी लिंक करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या कार्य़ालयांमध्ये जावे लागते. हे प्रचंड असुविधेचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
एक डिसेंबरपासून सुरु होईल सर्व्हिस
यूआयडीएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ६ फेब्रुवारी ही डेडलाईन आहे. तोपर्यंत देशातील टेलिकॉम कस्टमर्सना त्यांचे सिम आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे. डेडलाईन जवळ येत असल्याने सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सांगितले आहे, की ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करणे आवश्यक आहे. यासंदर्भात काल एक बैठक झाली. त्यात ३० नोव्हेंबरपर्यंत याबाबत तांत्रिक अडचण दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर एक डिसेंबरपासून ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
 
अशा आहेत तीन पद्धती

वन टाईम पासवर्ड
वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून सिमकार्ड अगदी सहज आधारकार्डशी लिंक करणे शक्य होईल. मोबाईल कंपन्या वेबसाईटवर किंवा अॅपवर ही सुविधा देईल. यात रजिस्ट्रेशन केल्यावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी वापरल्यानंतर सिमकार्ड आधारशी लिंक होईल. तसेच एकापेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन एका आधारवर घेतले असतील तर तेही असेच लिंक करता येतील.
 
आयव्हीआरएसमधून मिळेल सुविधा
या शिवाय ग्राहकाला हवे असेल तर इंटरॅक्टिव्ह वॉयस रिस्पॉन्स सिस्टिमच्या मदतीनेही सिमकार्ड आधारशी लिंक करता येईल. यासाठीही कंपनीच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर या सिस्टिमच्या माध्यमातून सिमकार्ड आधारशी लिंक होईल.
 
घरी एजंट येऊन करेल लिंक
ज्येष्ठ मोबाईल ग्राहकांसाठी ही सुविधा घरी येऊनही दिली जाईल. कुणी गंभीर आजारी असेल किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील तर मोबाईल कंपन्या घरी येऊन ही सुविधा देतील. यासाठी ग्राहकाला कंपनीकडे रिक्वेस्ट करावी लागेल. त्यानंतर कंपनी एक एजंट ग्राहकाच्या घरी पाठवेल.
 
बातम्या आणखी आहेत...