आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन अॅक्सेसचा महावितरणला फटका, ग्राहकांवर वीज शुल्क आकारण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खुल्या बाजाराचा पर्याय असल्याने (ओपन अॅक्सेस) महावितरणचे औद्योगिक ग्राहक सरकारी कंपनीकडून वीज घेत नसल्याचे दिसून आले आहे. याचा मोठा फटका महावितरणला बसत असल्याचे समोर आल्याने अशा ग्राहकांवर वीज शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिली.

प्रकाशगड येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजीवकुमार यांनी याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील राज्यांची तसेच खुल्या बाजाराची वीज स्वस्त असल्याने महावितरणच्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने एकतर शेजारील राज्यांमध्ये स्थलांतर केले आहे. तसेच राज्यात राहूनही रेमंड तसेच बड्या उद्योगांनी महावितरणकडे पाठ फिरवल्याने महावितरणला मोठा फटका बसून कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. खुल्या बाजाराकडे वळणाऱ्या ग्राहकांना वीज शुल्क आकारल्याने इतर औद्योगिक ग्राहक तसेच ओपन अॅक्सेसमध्ये जाणारे ग्राहक यांच्यात समानता आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ४० लाख कृषिपंप देण्यात आले असून त्यापैकी २० लाख पंपांवर मीटर बसवण्यात आले आहेत. वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून आता रीडिंग घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅपचा वापर
२० लाख पंपांवर कृषी मीटर बसवले गेेले असले तरी त्याचे रीडिंग करणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोपे जात नसल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर उरलेल्या २० लाख पंपांवर मीटर बसवणे फारच दीर्घकालीन आणि किचकट प्रक्रिया असल्याचे दिसून आल्याने मोबाइल अॅपचा उत्तम पर्याय निवडण्यात आला आहे, असे संजीवकुमार यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...