आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जॉब्स यांना विरोध केला, तरीही प्रमोशन मिळाले’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - घटना १९८५ ची आहे. आयफोनआधी २२ वर्षे आधीची गोष्ट. अॅपलचा मॅकिंतोश कॉम्प्युटर काही दिवस आधीच लाँच झाला होता. त्या काळात अॅपलच्या व्यवस्थापनातील युद्ध जोरात होते. अध्यक्ष जॉब्ज यांचे तत्कालीन सीईओ जॉन स्कलींशी कंपनीवर नियंत्रण मिळवण्यावरून वाद होता. (स्कली १९८५मध्ये जॉब्ज यांना कंपनीतून हटवण्यात यशस्वी ठरल्या. १९९३ मध्ये कंपनीने स्कली यांनाही बाहेर काढलेे १९९७ मध्ये जॉब्ज कंपनीत परतले होते.) जॉब्ज यांनी आपले सर्वस्व मँकितोश प्रोजेक्टमध्ये पणाला लावले होते.
त्यांना वाटत होते की अॅपलचे भविष्य त्यावर अवलंबून असेल. अचानक एके दिवशी जॉब्ज यांनी अमेरिकेत कंपनीचे सर्व सहा वेअर हाऊस बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला. जॉब्स कॉम्प्युटरचा स्टॉक करण्याच्या विरोधात होते. आवश्यक तेवढेच कॉम्प्युटर बनवावेत त्याच दिवशी कुरिअरने ग्राहकांना पाठवावेत अशी त्यांची योजना होती. यातून जॉब्ज खर्च वाचवू इच्छित होते. परंतु व्यवस्थापक डोना डुबिंस्की यांना ही चूक वाटत होती. वेअरहाऊस बंद केल्यास संपूर्ण कंपनीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. डुबिंस्की यांच्या दृृष्टीने हे पाऊल कंपनीसाठी घातक होतेचे. शिवाय त्यामुळे काही व्यवस्थापकांचे भवितव्यही धोक्यात आले असते. डुबिंस्की त्या वितरण विक्री व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापक होत्या. जॉब्ज अॅपलच्या अध्यक्ष तसेच मँकिंटोश सेक्शनचे उपाध्यक्षही होते. डुबिंस्कींसाठी जॉब्स यांच्या निर्णयाला अाव्हान देणे याचा अर्थ नोकरी गमावणे असाच होता. नोकरी गेली तर काही दिवस भागले असते. त्यामुळे त्यांनी जॉब्ज यांना म्हटले, मी, तुमच्या निर्णयाशी सहमत नाही.
मला नव्या प्रस्तावासाठी ३० दिवसांचा वेळ द्या. अन्यथा मी नोकरी सोडते. जॉब्ज यांना डुबिंस्की यांची स्पष्टता आवडली. त्यांनी डुबिंस्कींना बढती देऊन अॅपल कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकपदी बसवले. सहा महिन्यानंतर १९९१मध्ये डुबिंस्कींनी अॅपल सोडली. नंतर हँडस्प्रिंग कंपनी स्थापली. अनेक वर्षानंतर जॉब्ज त्यांची भेट झाली. तेव्हा जॉब्ज म्हणाले, मी कधी फोन बनवणार नव्हतो. परंतु २००७ मध्ये अॅपलने पहिला आयफोन लाँच केला. ज्याने इतिहास घडवला.
टिम कुक त्या काळात अॅपलमध्ये वितरणाचे काम बघत असत. त्याच विभागात कधीकाळी डुबिंस्की होत्या. आज कुक कंपनीचे सीईओ आहेत.

असे हाेते स्टीव्ह
{अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत लवचिक हाेते.
{ ते नेहमीच नवकल्पनांना प्राधान्य द्यायचे.