आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजलीचे बालकृष्ण पहिल्यांदा फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फोर्ब्जने भारतातील टॉप - १०० श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर केली असून यामध्ये पहिल्यांदाच पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांनी स्थान मिळवले आहे. कंपनीमध्ये त्यांचे ९७ टक्के शेअर आहेत. त्यांच्याकडे २.५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे, तर सलग नवव्यांदा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत.

एका वर्षात अंबानी यांच्याकडील कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर देशातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या एकूण मालमत्तेत २०१५ मधील २३.१ लाख कोटी रुपयांवरून (३४५ बिलियन डॉलर) २०१६ मध्ये वाढून २५.५ लाख कोटी रुपये (३८१ बिलियन डॉलर) झाली आहे.

फोर्ब्जच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बालकृष्ण यांना ४८ वे स्थान मिळाले आहे. फोर्ब्जने त्यांच्याविषयी लिहिले आहे की, ते राजकीय पातळीवर मजबूत असलेल्या बाबा रामदेव यांचे लहानपणीचे मित्र आहेत. दोघांनी पतंजली आयुर्वेदची स्थापना २००८ मध्ये केली. या कंपनीचे बालकृष्ण यांच्याकडे ९७ टक्के शेअर आहेत. दरवर्षी ७८० मिलियन डॉलरचा महसूल जमा करणारी कंपनी पतंजली टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि नूडल्सची विक्री करते. बाबा रामदेव यांच्याकडे कंपनीचे शेअर नसले तरी ते कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचे फोर्ब्जने लिहिले आहे. ही कंपनी पूर्णपणे बालकृष्ण चालवतात. पतंजलीची विदेशातही पाच हजार आयुर्वेद चिकित्सालये आहेत. याव्यतिरिक्त पतंजली विद्यापीठ, योग आणि आयुर्वेद संशोधन संस्थादेखील चालवते. यादीत नव्याने सहा नावांचा समावेश झाला असून १३ नावे वगळली आहेत.

यांची मालमत्ता वाढली : मुकेश अंबानी, हिंदुजा परिवार, गोदरेज परिवार, कुमारमंगलम बिर्ला, लक्ष्मी मित्तल
यांची मालमत्ता घटली : दिलीप सांघवी, अझिम प्रेमजी, शिव नाडर, पालोनजी मिस्त्री, गौतम अदानी
पुढे वाचा... क्रमवारीत झाला बदल
बातम्या आणखी आहेत...