आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पास्को-उत्तम गाल्व्हाची राज्यात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - दक्षिण अाफ्रिकेतील पास्को आणि उत्तम गाल्व्हा समूह ३ अब्ज डॉलरच्या (सुमारे २० हजार कोटी रुपये) सहयोगी गुंतवणुकीतून राज्यात तीन दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सातर्डा येथे सुमारे १७०० एकरवर हा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांत मंगळवारी मुंबईत सहयोगाचा करार झाला अाहे. यात पास्कोची २० टक्क,े तर उत्तम गाल्व्हाची ८० टक्के भागीदारी राहील.
या संदर्भात पास्कोच्या प्रवक्त्याने सांगितले, सातर्डा येथे दोन टप्प्यांत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वर्षाकाठी ३ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या करारावर सह्या झाल्या. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाची क्षमता १.५ दशलक्ष मेट्रिक टन आहे.

पहिले पाऊल
हा प्रकल्प म्हणजे पास्को आणि उत्तम गाल्व्हा यांच्या सहयोगाचे पहिले पाऊल असल्याचे उत्तम गाल्व्हाचे उपव्यवस्थापकीय संचालक अंकित मिगलानी यांनी सांगितले. ते म्हणाले, हा प्रकल्प पास्कोच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित असून पहिल्या टप्प्यासाठी १ ते १.५ अब्ज डॉलर खर्च येणार आहे.
सावंतवाडीजवळ उभारणार ३ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प

पास्कोला दिलासा
ओडिशामधील जगतसिंगपूर जिल्ह्यातील पास्कोचा प्रकल्प दशकभरापासून वादात अडकला आहे. कच्च्या मालाची उपलब्धता, सुरक्षितता आणि भूसंपादन अशा अनेक वादामुळे त्रस्त असलेल्या पास्कोला महाराष्ट्रातील गुंतवणुकीतून दिलासा मिळणार आहे.
मालाची उपलब्धता
मिगलानी यांनी सांगितले, गोव्यातील खाणीत लोहखनिज तसेच पोलाद मोठ्या प्रमाणात सापडते. हा आमच्यासाठीचा कच्चा माल आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सावंतवाडीनजीकच्या सातर्ड्याची निवड केली.

महाराष्ट्र शायनिंग
आठवडाभरात राज्यात होणारी ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. तीन दिवसांपूर्वीच तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने ३२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पास्कोने उत्तम गाल्व्हासह नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.