आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रीत ३५% पर्यंत वाढली गृहोपयोगी वस्तूंची विक्री; दिवाळीत ४०% च्या पुढे जाण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दोन वर्षांपासून मागणी घटल्यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू आणि किरकोळ कंपन्यांसाठी सणासुदीचे दिवस सकारात्मक ठरले आहेत. नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यातील विक्री १५ ते ३५ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. दिवाळीमध्ये ही विक्री ४० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. डिसेंबर तिमाहीमध्ये २० टक्के सरासरी विकासाचा अंदाज आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि चांगला मान्सून यामुळे हे झाले आहे. रिझर्व्ह बँकेनेदेखील रेपो रेट कमी करून सकारात्मक धारणा निर्माण केली आहे. याचा फायदा इतर सणासुदीच्या दिवसांतदेखील होईल, असे मत कंपन्यांनी व्यक्त केले आहे.
या मागे अर्थव्यवस्था चांगली राहिल्याने लोकांचे उत्पन्नही वाढले आहे हेदेखील एक कारण असल्याचे कन्सल्टन्सी संस्था टेक्नोपॅड अॅडव्हायझर्सचे सीएमडी अरविंद सिंघल यांनी सांगितले.
पॅनासोनिक इंडियाचे विपणनप्रमुख अजय सेठी यांनी सांगितले की, ऑक्टोबर -डिसेंबरमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स उद्योग २० टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने ३० ते ३५ टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. उषा इंटरनॅशनलचे गृहोपयोगी वस्तू विभागाचे अध्यक्ष अरविंदर सिंह यांनी सांगितले की, सर्वसामान्यपणे पूर्ण वर्षभराच्या
विक्रीतील ३५ टक्के विक्री सणासुदीच्या दरम्यान होते. आमच्या कंपनीला या वेळी सणांच्या काळातील विक्रीमध्ये ३० टक्के जास्त विक्रीची अपेक्षा असल्याचेही
त्यांनी सांगितले.
तसे पाहिले तर मागणी सप्टेंबर महिन्यातच वाढत होती. पक्ष पंधरवडा असला तरी गेल्या महिन्यात कार विक्रीत १५ टक्क्यांची वाढ झाली. किरकोळ विक्री करणाऱ्या मोठ्या कंपन्यादेखील फेस्टिव्ह कार्ड, डिस्काउंट व्हाउचर्स, बोनस रिवॉर्डसारख्या ऑफर देत आहेत. बिनव्याजी ईएमआयचीदेखील ऑफर आहे. मात्र, आॅफर्सच्या या खेळात ग्राहकांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे. एक ऑनलाइन पेमेंट कंपनी १०० टक्के कॅशबॅकचा प्रचार करते, मात्र ती कंपनी जास्तीत जास्त १५० रुपयांची कॅश बॅक देते. सोशल मीडियातही अनेक लोकांनी कंपन्यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोठ्या डिस्काउंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डिस्काउंटनंतरही वस्तू बाजारभावाप्रमाणे मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
ई-कॉमर्स : पहिल्याच आठवड्यात अंदाजापेक्षा जास्त विक्री
}सणासुदीच्या पहिल्याच आठवड्यात मागणी पाहता संशोधन संस्था रेडसिअरला आधीच्या अंदाजात बदल करावा लागला.
}आधी संस्थेने सांगितले, ऑक्टोबरमध्ये विक्री १०,००० कोटी रुपयांपर्यंत होईल. आता म्हणणे आहे की, पहिल्या आठवड्यातच विक्री ६,५०० ते ७,७०० कोटींची झाली आहे.
}महिनाभरात ११ ते १३ हजार कोटींच्या विक्रीचा अंदाज, गेल्या ऑक्टोबरमध्ये ९,००० कोटींची विक्री
}पहिल्या आठवड्यातच विक्रीत ५०% पर्यंतची भागीदारी एफएमसीजीची, ३०% फॅशन व लाइफ स्टाइल उत्पादनाची व २०% इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची झाली. मात्र, महसुलाबाबत ५०% हिस्सा इलेक्ट्रॉनिक्सचा, ३० % लाइफ स्टाइल व २० % एफएमसीजी उत्पादनाचा होता.
बातम्या आणखी आहेत...