आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Cheap By 32 Paise, Diesel Price Increase By 28 Paise

पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३२ पैशांची कपात, डिझेल २८ पैसे महाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३२ पैशांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे, डिझेल मात्र प्रतिलिटर २८ पैशांनी महाग करण्यात आले आहे. जागतिक बाजारातील कलाकडे बघता हा बदल करण्यात आला आहे. बुधवार मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

दरकपातीमुळे दिल्लीत पेट्रोल आता ५९.९५ रुपयांवरून ५९.६३ रुपये लिटरने मिळेल. डिझेल ४४.६८ रुपयांएेवजी ४४.९६ रुपये लिटरने घ्यावे लागेल.जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर उतरले आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात सलग सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे.