आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वाचवण्यासाठी औषधी कंपन्याचा बेकायदेशीर मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील औषध कंपन्या आधी डॉक्टरांना भेट वस्तू देतात. नंतर तो खर्च दाखवून करात सवलत मिळवतात, हे बेकायदेशी आहे, अशे ताशेरे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी (कॅग) त्यांच्या अहवालात ओढले आहेत.

कॅगने औषध कंपन्यांच २, ८६८ रेकॉर्ड्सची तपासणी केली. त्यापैकी २४६ प्रकरणांत कंपन्यांनी कर वाचवण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. िगफ्टचा खर्च दाखवून औषध कंपन्यांनी १, ३४८ कोटी रुपयांची कर चोरी केली आहे. वास्तविक मेडिकल कौन्सिलने (एमसीआय)देशातील फार्मा कंपन्यांना डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची भेटवस्तू वा रोख रक्कम अथवा टूर पॅकेज देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही (सीबीडीटी) २०१२ मध्ये अशा प्रकारच्या खर्चाला कंपनी खर्चात समाविष्ट करण्यास मनाई केली होती.

असा घेतात फायदा : भेटवस्तू कंपन्यांच्या खर्चात समाविष्ट केल्यामुळे खात्यांवर कंपनीचे उत्पन्न कमी दिसते. त्यामुळे त्यांना करही कमीच द्यावा लागतो. परंतु खर्चात त्यांचा समावेश न केल्यास तो लाभ गृहीत धरला जातो. म्हणजे कंपन्यांच्या नफ्यातून भेटवस्तूंचा खर्च काढावा लागेल. त्यांना एकूण नफ्यावर कर द्यावा लागेल.

'रिसर्च' खर्चातून ५७०
कोटींची करचोरी
संशोधन व विकासावर करण्यात आलेला खर्च कंपनीच्या खर्चात जोडण्यात आल्याची २२ प्रकरण्े कॅगने शोधून काढली आहेत. यात ५७० कोटी रुपयांची करचोरी कंपन्यांनी केली आहे. संशोधन व विकासावरील कोणत्याही खर्चाच्या दाव्याला शास्त्रज्ञ व औद्योगिक संशोधन विभागाची मान्यता मिळवावी लागते. तेव्हा कुठे त्यावर २०० टक्के सवत मिळते. म्हणजे यावर झालेल्या खर्चाच्या रकमेच्या दुप्पट रकमेवर कर भरावा लागत नाही. पण त्यांची परवानगी न घेताच कंपन्यांनी सूट मिळवली आहे.