आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB ला 561 कोटी रुपयांचा नफा, एनपीए घटून 8.44 टक्क्यांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आर्थिक वर्षे २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत पंजाब नॅशनल बॅंकेला सुमारे ५६१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेच्या नफ्यात सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बॅंकेला ५४९.४ कोटी रुपये नफा झाला होता. पीएनबीने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. एनपीए घटविण्यात बॅंकेला यश आले आहे. दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचा नेट एनपीए ८.४४ टक्के राहीला.
 
ग्रॉस एनपीए ०.३५ टक्क्यांनी घटला
तिमाही आधारवर पीएनबीचा ग्रॉस एनपीए १३.६६ टक्क्यांनी घटून १३.३१ टक्के राहिला आहे. सप्टेंबर तिमाहीत पीएनबीचा ग्रॉस एनपीए ५७,७२१ कोटी रुपयांपासून घटून ५७,६३० कोटी रुपये झाला आहे. जुन तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत पीएनबीचा नेट एनपीए ८.६७ टक्क्यांनी घटून ८.४४ टक्क्यांवर राहिला. रुपयांत नेट एनपीए ३४,५७३ कोटी रुपयांनी घटून ३४,५७० कोटी रुपये झाला आहे.
 
शेअर्समध्ये ७ टक्क्यांनी तेजी
आकडे जाहीर झाल्यावर पीएनबीचे शेअर्स ७ टक्क्यांनी वधारले. गुरुवारी शेअर १९७ रुपयांवर बंद झाले. आज शेअर्स ७.६१ टक्क्यांनी वाढून २१२ रुपयांवर गेले. सध्या ५ टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. गेल्या एका महिन्यात बॅंकेच्या शेअरमध्ये ५९ टक्के तेजी दिसून आली आहे. विशेष करुन पीएसयू बॅंकांसाठी २.११ लाख कोटीचे रिकॅपिटलायझेशन प्लानची मंजुरी मिळाल्यानंतर शेअरमध्ये खास तेजी दिसून आली. २४ ऑक्टोबर रोजी शेअर १३७ रुपये भावावर होता. 
बातम्या आणखी आहेत...