आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीचा सामना करण्यासाठी धोरणात बदल - जेटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जागतिक मंदीचा परिणाम सर्वच अर्थव्यवस्थांवर होत असून त्याचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवरील आर्थिक धोरणात बदल करणे अावश्यक असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक प्रमुखांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मागणीत घट, अार्थिक बाजारातील सक्ती, व्यवसायात सुस्ती आणि अस्थिर गुंतवणूक यामुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत मंदी दिसत असल्याचे मत जेटली यांनी व्यक्त केले. चीनमध्ये आलेल्या मंदीनंतर चीन सरकारने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यामुळे इतर देशांच्या उत्पादन क्षेत्राला चालना मिळण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर आयात आणि निर्यातीमध्ये घट होत असून ही चिंतेची बाब
असल्याचे जेटली म्हणाले. त्यावर उपाय करण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामुळे जागतिक पातळीवरील सर्व अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर देशांमध्ये व्यवहार वाढवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय आणि प्रतिस्पर्धेचे अवमूल्यन थांबवण्यावर त्यांनी जोर दिला. जागतिक आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्यावर भर द्यावा लागणार असल्याचेही जेटली यांनी या वेळी सांगितले.