आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टपाल खात्याचे ‘पाेस्टमन अॅप’ देणार माल पाेचपावती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काेठेही कुरियर पाठवायचे असेल तर चटकन डाेळ्यासमाेर येतात त्या खासगी कुरियर कंपन्या. कारण टपाल खात्याचे पत्र किंवा कुरियर वेळेवर पाेहोचेल याची खात्री नाही. त्यामुळे पाेस्टापेक्षा खासगी कंपन्यांवर लाेकांचा जास्त विश्वास अाहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून टपाल खात्याला बळकटी देण्यासाठी अलीकडेच टपाल खात्याला बँकेचा दर्जा मिळाला.
त्यानंतरचे अाता पुढचे पाऊल म्हणून टपाल खात्याकडून पाठवण्यात येणाऱ्या विविध मालाचे वितरण अचूक वेळेत हाेण्यासाठी ‘पाेस्टमन अॅप’ सुरू करण्यात अाले अाहे. मध्य प्रदेशात छिंदवाडा अाणि महाराष्ट्रात भांडूप येथे प्रायाेगिक तत्त्वावर हे अॅप सुरू झाले अाहे. लवकरच देशभरातील पाेस्टमनच्या हातात हे माेबाइल अॅप दिसेल. पाेस्टामार्फत पाठवण्यात अालेली वस्तू लवकर अाणि व्यवस्थित पाेहोचल्याची पाेचपावती या अॅपमुळे मिळू शकणार अाहे.
खासगी कुरियर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय टपाल खाते सध्या अापला माहिती तंत्रज्ञान विभाग अाधुनिक करण्याची माेहीम राबवत अाहे. ‘पाेस्टमन अॅप’ हे त्याचेच पुढचे पाऊल म्हणता येईल. स्पीड पाेस्ट, रजिस्टर्ड पार्सल, इलेक्ट्राॅनिक मनिअाॅर्डर, कॅश अाॅन डिलिव्हरी तसेच अन्य मालाची पाठवणी याला बळकटी देण्यासाठी टपाल खात्याने हे अॅप विकसित केले अाहे.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते गुरुवारी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे या अॅपचे लोकार्पण करण्यात अाले. महाराष्ट्रात अॅप सेवा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम भांडूप पूर्व येथील टपाल कार्यालयात प्रायाेगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात अाली अाहे. या टपाल कार्यालयातील १८ पाेस्टमनना दहा दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर अाता नवीन अॅप सेवा देण्यासाठी ते सज्ज झाले अाहेत.
अॅप कशासाठी ?
म्हैसूर येथील ‘सेंटर अाॅफ एक्सलन्स इन पाेस्टल टेक्नाॅलाॅजी’ या संस्थेने हे अॅप विकसित केले अाहे. कॅश अाॅन डिलिव्हरीसह टपाल खात्यामार्फत पाठवल्या जाणाऱ्या मालाच्या वितरणासाठी पाेस्टमन माेबाइलच्या मदतीने या अॅपचा उपयाेग करतील.

अॅपचा फायदा काय : > जीपीएस तंत्रज्ञानामुळे मालाचे वितरण झाल्याची वास्तव वेळ समजेल. > बारकाेड स्कॅनरच्या माध्यमातून मालाची वितरण झाल्याची नाेंद
> वितरण झाल्यानंतर त्याची माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर तातडीने अपलाेड हाेईल.

व्यक्तींना फायद्याचे
माेबाइल अॅप सुरू झाल्यामुळे स्पीड पाेस्ट, रजिस्टर या दाेन्ही सेवांमध्ये अाणखी वाढ हाेईल अाणि विशेष करून पाठवणारी अाणि स्वीकारणारी व्यक्ती या दाेघांनाही ती फायद्याची ठरेल.
- अशाेककुमार दास, मुख्य पाेस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र मंडळ
बातम्या आणखी आहेत...