आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकीटबंद डाळींच्या किमतीवरही नियंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डाळ, दुधासारख्या अत्यावश्यक कमोडिटीच्या किमती सरकारच्या नियंत्रणात घेण्याचा विचार करण्यात येत आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून आवश्यक वस्तूंचे दर निश्चित करण्याचा अधिकार आपल्याकडे घेण्याचा विचार सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. डाळींच्या साठेबाजांविरोधात तसेच नफाखोरांविरोधात सरकारच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पाकीटबंद डाळींच्या किमती देखील सरकारच्या वतीने निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी नियम तयार करण्यात येत असून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नोटिफिकेशन देखील जाहीर केले आहे. कंपन्या डाळी पाकिटात बंद करून जास्त नफा कमवत असल्याचे सरकारचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...