आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Production Rate Is 22 Months Low In Month Of Octomber

ऑक्टोबरमध्ये उत्पादन बावीस महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील उत्पादनातील हालचाली ऑक्टोबरमध्ये कमी होऊन २२ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मुख्यत: नव्या ऑर्डर मिळण्याची गती कमी झाल्याने असे झाले आहे. असे असले तरी कंपन्यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
निक्केई इंडियाचा उत्पादन पीएमआय ऑक्टोबरमध्ये ५०.७ वर राहिला, तो सप्टेंबरमध्ये ५१.२ होता. यामुळे व्यवसायाची स्थिती सुधारण्यामध्ये नरमीचे संकेत मिळाले आहेत. इंडेक्स ५० पेक्षा जास्त असेल तर उत्पादन क्षेत्रात वाढ, तर ५० पेक्षा कमी असल्यास घट होत असल्याचे मानले जाते.

मार्किटच्या अर्थतज्ज्ञ आणि रिपाेर्टच्या लेखिका पॉलियाना डी लीमा यांनी सांगितले की, ऑक्टोबरमधील पीएमआय आकड्यांमुळे भारतीय उत्पादनाच्या हालचालींमध्ये आणखी दबावाचे संकेत मिळत आहेत. असे असले तरी नवीन ऑर्डर मिळण्याची गती मंदावली असली तरी कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त कामगारांची भरती केली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच रोजगारामध्ये वाढ दिसून आली.