आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डाळींच्या किमती होणार कमी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकार बाजारात डाळींची आवक वाढवून डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्याचा विचार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी साेमवारी दिली. डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डाळींचे भाव वाढलेले आहेत. बाजारात डाळींची आवक वाढवून त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य सचिवांनी नुकतीच एक बैठक घेतली.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार उत्पादनातील कमतरतेमुळे डाळींच्या किमती एका वर्षात ६४ टक्के वाढल्या आहेत. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मल्टिमीडिया प्रदर्शनाच्या उद््घाटनानंतर अर्थमंत्री पत्रकारांशी बोलत होते. सलग दुसऱ्या वर्षी मान्सून दरम्यान कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकार एमएमटीसी या सरकारी कंपनीच्या माध्यमातून डाळींची आयात करण्याचा िवचार करत आहे. या माध्यमातून डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवता येतील, असे या वेळी जेटली यांनी सांगितले.

उत्पादनात ६.८२ टक्के घट
या वर्षी २०१४-१५ (जून ते जुलै) मध्ये डाळींचे उत्पादन १.८४३ कोटी टन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी झालेले १.९७८ कोटी टनापेक्षा ६.८२ टक्के कमी आहे. भारत वर्षभरात १.८ ते २ कोटी टनाच्या दरम्यान डाळींचे उत्पादन करतो, तर भारताला दरवर्षी ३० ते ४० लाख टन डाळींची आयात करावी लागते. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत ही आयात फक्त खासगी व्यापाऱ्यांच्याच माध्यमातून करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...