आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता, बजटमध्ये 5 ते 10 % होऊ शकते वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणे आणखी महागण्याची शक्यता आहे. प्रवासी भाडे पाच ते १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांच्या मते, रेल्वेला पैशांची चणचण भासते आहे. मालवाहतुकीचे उत्पन्नही घटले आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास रेल्वेवर ३२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. तर २०१५-१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातही रेल्वे मंत्रालयाला अर्थसंकल्पीय तरतूदही ८००० कोटी रुपयांपेक्षा कमी मिळाली होती.

सूत्रांनी सांगितले, पैसे उभारणीसाठी अनेक पर्यायांचा विचार होत आहे. निवडक मार्गावरील प्रवासी भाड्यात वाढ करणे आणि सेवा महाग करण्याचाही एक पर्याय आहे. मात्र अद्याप काही निश्चित नाही. रेल्वे अर्थसंकल्पातच भाडेवाढ होईल असेही नाही. त्यापूर्वी किंवा नंतरही ती लागू केली जाऊ शकते. यंदाचा (२०१६-१७) रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मार्चपासून रेल्वेचा महत्त्वाचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे प्रवासी भाडे वाढण्याची जास्त शक्यता आहे. कारण त्यामुळे उत्पन्न वाढेल. असे झाले तर काही मार्गावरील प्रवासी भाडे किफायतशीर विमान वाहतुकीच्या भाड्यापेक्षा जास्त होईल. रेल्वेच्या मालवाहतुकीचे दरही जास्त आहेत. मात्र स्टील, कोळसा, लोह खनिज आणि खतांची वाहतूक कमी झाली अाहे. अशा स्थितीत मालवाहतुकीचे दर वाढवणे अवघड आहे. दर वाढवले तरवाहतुकीचे उत्पन्न घटू शकते. मालवाहतूक, प्रवासी भाड्यातून होणारे रेल्वेचे एकूण उत्पन्न १.३६ लाख कोटी रुपये राहीले. उद्दिष्ट १.४१ लाख कोटी रुपये आहे.

दरम्यान उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करण्यासाठी रेल्वे इतर पर्यांयावरही विचार करत आहे. रेल्वेच्या मालकीच्या पडीक जमीनी व्यावसायिक वापरासाठी भाड्याने देण्याचाही विचार होऊ शकतो.
रेल्वे दैनिक उत्पन्नावर ठेवणार नजर
रेल्वे लवकरच प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे दर यांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावर दररोज नजर ठेवणार आहे. यासाठी मॅनेजमेट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एमआयएस) सादर करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

भाडेवाढीची शिफारस
रेल्वेने अॅक्सिस कॅपिटलकडून एक सर्वेक्षण केले आहे. यात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रवासी भाडे १० टक्के आणि मालवाहतुकीचे दर टक्के वाढवण्याची शिफारस केली आहे.

मोदींच्या काळात दोन वेळा भाड्यात वाढ
एनडीए सरकारने २०१४ मध्ये सर्व श्रेणींचे प्रवासी भाडे १४ टक्के वाढवले होते. त्यानंतरही मागील वर्षी यात १० टक्के वाढ झाली होती.