आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन यांच्याकडे भारतीय पासपोर्ट : आरबीआय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन भारतीय नागरिक असून त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेच्या वतीने बुधवारी देण्यात आले. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण हाेत आला असून त्यांना पुन्हा गव्हर्नर बनवण्यात येईल का, याविषयी चर्चा सुरू असताना बँकेने ही माहिती जाहीर केल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या महिन्यात गव्हर्नरांची मानसिकता पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप लावला होता. राजन यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड असल्याने त्यांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणीदेखील स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे केली होती. यादरम्यान अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राजन यांच्या दुसऱ्यांदा गव्हर्नरपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री अरुण जेटली वेळ आल्यावर घेणार असल्याचे सांगितले होते. राजन यांनी पत्रकारांशी बोलताना आरोपांवर बोलण्यास नकार दिला होता.
बातम्या आणखी आहेत...