आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राजेश'ने घेतली सर्वात मोठी सोने रिफायनरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील मोठी साेन्याच्या दागिन्यांची विक्री करणारी कंपनी राजेश एक्सपोर्टस लिमिटेड (आयईएल)ने जगातील सर्वात मोठी सोने रिफायनरी कंपनी वालकांबी विकत घेतली आहे. हा सौदा ४० कोटी डॉलर (२,५६० कोटी रुपये) मध्ये झाला आहे. कंपनी या व्यवहाराचे पूर्ण पैसे नगदी देणार आहे. विशेष म्हणजे वालकांबीचे वर्षाचे उत्पन्न हे राजेश एक्सपोर्ट््सच्या उत्पन्नाच्या जवळपास दहापट आहे.

जगातील सोन्याच्या व्यवसायातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे राजेश एक्सपोर्ट््सचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी म्हटले आहे. यामुळे ग्रुपचे उत्पन्न आणि क्षेत्र दोन्ही वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तर वालकांबीचे अधिग्रहण म्हणजे सोन्याच्या मायनिंग उद्योगात आमचे पहिले पाऊल असल्याचे कंपनीचे एमडी प्रशांत मेहता यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन वर्षांत आम्ही मायनिंग सुरू करणार असून उत्तराखंडातील रुद्रपूर रिफायनरीची क्षमता वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.

अधिग्रहणासाठी ३० ते ४० टक्के पैसे क्रेडिट सुइसने कर्ज स्वरूपात दिले आहेत, तर उर्वरित पैसे कंपनीने जमा केले आहेत. हे कर्जदेखील चार वर्षांत फेडणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. राजेश एक्सपोर्ट््सचे २०१३-१४ मधील उत्पन्न २३,५३५.३९ कोटी रुपये, तर नफा २२९.१३ कोटी रुपये होता. राजेश एक्सपोर्ट््सची देशात "शुभ' नावाने ८२ दुकाने आहेत, तर येत्या तीन वर्षांत त्यांचा अाकडा ४५० करण्याचा कंपनीचा मानस आहे. यातील काही दुकाने कंपनीची, तर काही फ्रँचायझी असणार आहेत. सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स जवळपास २ टक्के अापटला असला तरी कंपनीचे शेअर २ टक्क्यांपेक्षा जास्त भावाने वाढले आहेत.

सोन्यावर प्रक्रिया
वालकांबीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. आतापर्यंत न्यूमोंटा मायनिंग कॉर्पोरेशनसह काही गुंतवणूकदारांच्या हातात वालकांबी होते. येथे दरवर्षी साधारणत: ९४५ टन सोन्यावर प्रक्रिया करण्यात येते. हा अाकडा वर्षभरात भारतात विक्री होणा-या सोन्याच्या बरोबरीत आहे, तर कंपनीत वर्षाला जवळपास ३२५ टन चांदीवर प्रक्रिया केली जाते. कंपनीचे वार्षिक उत्पन्न २.३६ लाख कोटी रुपये, तर नफा २०५ कोटी रुपये आहे.