आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Governor Raghuram Rajan Gets Less Package To Other Officers

RBI गव्हर्नरपेक्षा इतर अधिकाऱ्यांना मिळतो जास्त पगार, वाचा सॅलरी स्ट्रक्चर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळेही राजन कायम चर्चेत असतात. या सर्व कारणांमुळे रघुराम राजन एका स्टार गव्हर्नर ठरले आहेत. पण वार्षिक पॅकेजचा विचार केला तर राजन यांना त्यांच्या बॅंकेतील अधिकाऱ्यांपेक्षाही कमी पगार मिळतो. रिझर्व्ह बॅंकेने याची माहिती वेबसाईटवर जाहीर केली आहे.
रघुराम राजन यांचे मासिक वेतन 198700 रुपये आहे. त्यात 90000 बेसिक, 101700 रुपये महागाई भत्ता, 7000 रुपये इतर भत्ते यांचा समावेश आहे. त्यांच्या हाताखाली काम करणारे गोपाळकृष्ण सिताराम हेगडे, अन्नामलाई अरापुल्ली गाऊंदर आणि व्ही. कंडास्वामी यांचे पॅकेज जास्त आहे. म्हणजे राजन यांना त्यांच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी पगार मिळतो. म्हणजे त्यांच्या पदाला असलेली प्रतिष्ठा जास्त असली तरी आर्थिक लाभ मात्र तोकडा आहे.
माहितीच्या अधिकारात दाखल करण्यात आलेल्या एका अर्जावर उत्तर देताना रिझर्व्ह बॅंकेने आपल्या वेबसाईटवर वार्षिक पॅकेजेसची माहिती जाहीर केली आहे. त्यात ही बाब उघडकीस आली आहे. पण रिझर्व्ह बॅंकेतील इतर अधिकाऱ्यांचे पद सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी हेगडे प्रधान कायदे सल्लागार म्हणून काम करत होते.
पुढील स्लाईडवर वाचा, रिझर्व्ह बॅंकेच्या इतर अधिकाऱ्यांना किती मिळतो मासिक पगार....