आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो रेटमध्ये 0.50% कपात, ग्राहकांना थेट फायदा, SBI ने कमी केला व्याजदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने उद्योजक आणि सर्वसामान्यांना दरकपातीची भेट दिली आहे. आरबीआयने आपेक्षेनुसार रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. याचा थेट फायदा गृह, वाहन कर्जावरील ईएमआय कमी होण्यावर मिळणार आहे. याची सुरुवात बँकानी केली आहे. आंध्रा बँकेने नवी योजना तत्काळ आंमलात आणत ग्राहकांच्या कर्ज दरात कपात केली आहे. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या बेस रेटमध्ये 0.40 टक्के कपात केली आहे.
केंद्र सरकार आणि उद्योग जगताच्या अंदाजानूसार पाऊल उचलत आरबीआयने रेपो रेट दरात 0.50 टक्के कपात केली आहे. मंगळवारी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना रेपो रेट दरात कपात 0.50% करत 6.75% केला आहे. जानेवारी पासून आतापर्यंत रेपो रेट दरात झालेली ही चौथी कपात आहे. रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरात कपात झाल्याने उद्योगांचे कर्ज स्वस्त होणार आहे. त्यासोबतच गृह, वाहनांसह इतर कर्जदारांनाही दिलासा मिळेल. ज्यांचे आधीपासून कर्ज सुरु आहे त्यांच्या ईएमआयमध्ये कपात होईल.

आरबीआयने सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 21.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. रिव्हर्स रेपो दरात कपात करुन आता 5.75 टक्के झाला आहे. महागाईवर नियंत्रण आणणे आणि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी गव्हर्नर राजन यांनी हा निर्णय घेतला आहे.

का कमी केला रेपो रेट

आरबीआयला कर्ज स्वस्त करण्यासाठी अनुकुल वातावरण तयार झाले होते. महागाई दर खाली आला आहे. मागील 10 महिन्यात ठोक महागाई दर 4.95 टक्क्यांवर आहे. रिटेल मधील महागाई देखील ऑगस्टमध्ये 3.66 टक्क्यांवर घसरली आहे.
ग्रोथ रेट आणि IIP चा दबाव
चालू आर्थिक वर्षाच्या 2015-16 पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ 7 टक्के राहिली आहे. उद्योग जगताच्या दृष्टीने ती कमी आहे. याशिवाय आयआयपी एप्रिल - जुलैमध्ये 3.5 टक्के होते. त्यामुळे ग्रोथ रेट वाढण्यासाठी व्याज दरातील कपातीची आपेक्षा होती.
या वर्षी चारवेळा कपात
आरबीआयने जानेवारी 2015 पासून आतापर्यंत चार वेळा रेपो रेटमध्ये कापत केली आहे. याआधी 15 जानेवारी, 4 मार्च आणि 16 जून रोजी दरकपात झाली होती. 4 ऑगस्ट रोजीच्या पॉलिसीमध्ये आरबीआयने कोणताही बदल केला नव्हता.

काय आहे रेपो रेट आणि सीआरआर


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला रेपो रेट म्हटले जाते. याचा सध्याचा दर सध्या 6.75 टक्के आहे. सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, ही रक्कम बँकांना रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते. याचा दर सध्या 4 टक्के आहे.
प्रमुख दर
रेट (टक्केवारीमध्ये )
रेपो रेट6.75
रिव्हर्स रेपो रेट
5.75
सीआरआर4.00
एसएलआर21.5