आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनंतर सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होतील हे बदल, राज्य कर्मचाऱ्यांची रोखीने पगार देण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदी लागू झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा पहिला पगार कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहे. सध्या रोखीचा तुटवडा जाणवणाऱ्या कर्मचारी वर्गात या पगाराची मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. पण नोटबंदीनंतर अनेक सेक्टरमध्ये सॅलरीचे स्वरुप बदलणार आहे. विशेष म्हणजे असंघटीत क्षेत्रात सॅलरी मिळण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झालेला दिसून येईल. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनीही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे, की डिसेंबरला मिळणारा पगार सरकारने रोखीने द्यावा. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या पगाराची उचल डिसेंबर महिन्यातच करता यावी. म्हणजेच दोन महिन्यांचा पगार एकाच वेळी द्यावा.
जुन्या नोटांवर बंदी असल्याने आणि नवीन चलनाचा तुटवडा जाणवत असल्याने मोठमोठ्या कंपन्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरवर परिणाम होणार आहे. याची तयारी सुरु झाली आहे. सर्वांत मोठी समस्या लहान आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांमध्ये येणार आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या मालकांपासून एचआर विभागापर्यंत सर्वच नवनवीन धोरणे अवलंबताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की कोणत्या सेक्टरमध्ये नोटबंदीनंतर सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला दिसून येईल... कुणाला याचा फायदा होईल आणि कुणाचे नुकसान...
पुढील स्लाईडवर वाचा... काय होतील परिणाम....
बातम्या आणखी आहेत...