आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या शहरांदरम्यान 2500 रुपयांत 1 तासाचा विमान प्रवास, जानेवारीपासून उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने स्वस्त हवाई सफरीचा मार्ग मोकळा केला आहे. एव्हिएशन मिनिस्टर अशोक गजापती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारी रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम 'उडान' (UDAN) लॉन्च केली आहे. सरकारने म्हटले आहे की या योजनेंतर्गत अनुदानित रिजनल फ्लाइट तिकीटांची किंमत 2500 रुपये प्रति तास राहाणार आहे. प्रादेशिक विमान वाहतुकीला चालना मिळावी, हा सरकारचा यामागे उद्देश आहे. ही योजना जानेवारी 2017 पासून सुरु होणार आहे.
- सामान्य नागरिकांना विमान सफरीचा आनंद यामुळे घेता येईले, असा विश्वास राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला.
- UDAN म्हणजे, 'उडे देश का आम नागरिक' असाही अर्थ असल्याचे सांगितले जात आहे.

UDAN चे वैशिष्ट्य
- 500 किलोमीटरच्या फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट फ्लाइटसाठी २,५०० रुपये प्रति तास तिकीट ठेवले जाणार आहे. यात सर्व करांचा समावेश असेल.
- हा किराया अशा मार्गांवर असेल, जिथे सध्या कमी फ्लाइट चालवले जातात किंवा एकही फ्लाइट नसते.
- फ्लाइटमधील 50 टक्के सिट्स UDAN अंतर्गत आरक्षित असतील, त्यांचे तिकीट 2500 रुपये असेल. उर्वरित सिट्सवर मार्केट बेस्ड प्राइज असेल.
बातम्या आणखी आहेत...