नवी दिल्ली- पेट्रोल पंप सुरु करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. तुम्ही लवकरच
आपला स्वत:चा पेट्रोल पंप सुरु करू शकतात. रिलायन्स, एस्सार व शैल सारख्या खासगी पेट्रोलियम कंपन्यांचा रिटेल आउटलेट उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2015 -2016 मध्ये अनेक खासगी कंपन्या आपापले पेट्रोल पंप सुरु करणार आहेत.
देशभरात खासगी कंपन्या पाच हजारांहून जास्त पेट्रोल पंप सुरु करणार आहे. इच्छूक लोक पेट्रोल पंपसाठी अर्ज करून चांगला मोबदला मिळवू शकतात. दरम्यान, क्रूडच्या दरात प्रचंड घट आली आहे. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे.
रिलायन्स, एस्सार व शैल या सारख्या खासगी पेट्रोलियम कंपन्या पुढील दोन वर्षांत आपापले पेट्रोल पंप सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे देशातील छोट्या उद्योजकांना नवा बिझनेस सुरु करण्याच्या संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे देशातील सुशिक्षितांना नवे रोजगार मिळतील.
पुढील स्लाइडवर वाचा, रिलायन्स, एस्सार व शैल कंपनीच्या योजना...