आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Industries Posts Rs 6,381 Crore Q4 Profit

रिलायन्सच्या चौथ्या तिमाहिच्या नफ्यात 8.5% वाढ, निव्वळ नफा 6,381 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उद्योगपती धीरुभाई अंबानी यांनी स्थापना केलेल्या आणि आता मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चौथ्या तिमाहिच्या नफ्यात तब्बल 8.5 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. रिलायन्सचा निव्वळ नफा 6,381 कोटी रुपये झाला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीला 6,381 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत कंपनीला 5881 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता, असे रिलायन्सने सांगितले आहे.
2014-15 या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांमध्ये मोठी घट झाल्याने कंपनीचा रेव्हेन्यू 103,428 कोटी रुपयांवरुन 67,470 रुपयांवर आला आहे.
कच्च्या तेलाचे एक बॅरल वापरण्याजोग्या तेलाच्या एका बॅरलमध्ये बदलताना रिलायन्सला 10.1 डॉलर रुपये कमाई होते. 2013-14 या आर्थिक वर्षांत ही कमाई 9.3 डॉलर प्रति बॅरल होती.
रिलायन्स इंडस्ट्रिजने प्रति शेअर 10 रुपये डिव्हिडंट जाहीर केला आहे. कंपनीच्या नफ्यावर रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रिलायन्स इंडस्ट्रिजच्या जामनगर येथील रिफायनरीचे फोटो....