आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio 1 वर्षांचे: 250 रुपयांचा 1GB डाटा मिळतो 50 रुपयांत, देशात 3 पटींनी वाढले 4G फोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स जिओच्या कमर्शियल सर्व्हिसला 5 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले (फाइल) - Divya Marathi
रिलायन्स जिओच्या कमर्शियल सर्व्हिसला 5 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले (फाइल)
नवी दिल्ली - रिलायन्स जिओ लॉन्च होऊन एक वर्ष झाले आहे. एका वर्षात टेलिकॉम क्षेत्रात जिओची एंट्री एका सुनामीसारखी राहिली आहे. 365 दिवसांमध्ये जिओने संपूर्ण टेलिकॉम इंडस्ट्रीची समीकरणे बदलून टाकली आहे. याचा सर्वाधिक फायदा हा ग्राहकांना झाला आहे. एक वर्षापूर्वी 1 GB डाटा साठी महिन्याला 250 रुपये खर्च करावे लागत होते. आता हा रेट 50 रुपये प्रती डाटावर येऊन ठेपला आहे. एवढेच नाही तर दुरसंचार क्षेत्रातील सर्व कामकाजच बदलले आहे. याचे परिणाम सिम अॅक्टिव्हेशन पासून डाटा ट्रान्सफरपर्यंत पाहायला मिळतात. 
 
- डाटा वॉरनंतर ग्राहकांच्या फायद्याचे अनेक बदल करण्यात आले. उदाहरणार्थ, तुमचे सिम आता अर्ध्या तासाच्या आत अॅक्टिव्ह होते. न वापरलेला डाटा पुढील महिन्यात ट्रान्सफर होत आहे. ही सर्व्हिस एअरटेलने सुरु केली आहे. ग्राहकांसाठी जणू हा एक सुवर्णकाळ आहे. 
- एकीकडे ग्राहकांना फायदा होत असल्याचे दिसत असताना टेलिकॉम कंपन्यांमध्येही काही बदल होताना दिसत आहेत. त्यांचे उत्पन्न घटले आहे, इंडस्ट्री विलिनीकरणाचे प्रमाण वाढले आहे, इंडस्ट्री स्पष्टपणे दोन भागांमध्ये विभागली आहे. 
 
ग्राहक झाला राजा 
- 5 सप्टेंबर 2016 ला जेव्हा जिओ सर्व्हिस सुरु झाली होती, तेव्हा इंटरनेट हे प्रत्येकाच्या आवाक्या नव्हते. 
- एक जीबी डाटा साठी ग्राहकांना 250 रुपये दर महिन्याला खर्च करावे लागत होते. मात्र या एका वर्षात इंटरनेट वापर अतिशय स्वस्त झाला आहे. आता 50 रुपयांमध्ये महिनाभर 1GB डाटा मिळतो. 
- एवढेच नाही तर एक वर्षात कॉल रेटही घसरले आहेत. काही कंपन्यांनी तर व्हाइट कॉल एक प्रकारे फ्री करुन टाकले आहेत. म्हणजेच डाटा यूज करा, व्हाइस कॉलचे नो टेन्शन. 
- जिओ लॉन्चिगलाच मुकेश अंबानींनी सांगितले होते की जिओ सर्व्हिस व्हाइस कॉल पूर्णपणे फ्री करेल.  
- जिओच्या या धोरणामुळे दुसऱ्या कंपन्यांनाही हीच स्ट्रॅटेजी आत्मसात करावी लागली आहे. 
 
15 कोटींपेक्षा जास्त 4G स्मार्टफोन 
- गेल्या एक वर्षात 4G फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका अहवालानुसार, देशात सध्याच्या घडीला 15 कोटींपेक्षा जास्त 4G स्मार्टफोन आहे. मार्च 2016 मध्ये ही संख्या 4.7 कोटी होती. म्हणजेच एका वर्षात 4G स्मार्टफोनची संख्या तीन पटींनी वाढली आहे. 
बातम्या आणखी आहेत...